Share

ओवेसी मंचावर असताना ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या तरुणीला मिळाला जामीन

Published On: 

बंगळुरु – बंगळुरु उच्च न्यायालयाने गुरुवारी अमुल्या लियोनाला जामीन दिला आहे. 20 फेब्रुवरीला सीएए, एनआरसीविरोधी आयोजित करण्यात आलेल्या सभेत पाकिस्तान जिंदाबादचा नारा दिल्याने तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सीआरपीसीच्या कलम 167 (2) नुसार अमुल्याला जामीन मंजूर झाला आहे.

या कलमांतर्गत पोलिसांनी आरोपींविरोधात 90 दिवसांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करायचे असते. मात्र, पोलिसांनी अद्याप तसे केले नाही, त्यामुळे तीला जामीन मंजूर झाल्याचे अमूल्याचे वकील प्रसन्ना यांनी सांगितले.

दरम्यान, बंगळुरूमध्ये सीएए, एनसीआर आणि एनपीआर विरोधात फेब्रुवारी महिन्यात संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले. खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या रॅलीला संबोधित केले होते. अमुल्या या तरुणीने त्यांचे भाषण झाल्यानंतर सभेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या.

ओवेसी यांनी तेव्हा धाव घेत अमुल्याकडून माईक खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. तिला सभेच्या आयोजकांनीही अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. या प्रकरणी खासदार ओवेसी यांनी या घटनेचा निषेध केला.

या तरुणीला आयोजकांनी आंमत्रण द्यायला नको होते. हे मला आधीच माहित असते तर मी आलोच नसतो. आम्ही हिंदुस्थानी असून आमच्या शत्रू राष्ट्राला कधीच पाठिंबा नव्हता. हिंदुस्थानला वाचणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे ओवेसी यांनी सांगितले होते.

महाराष्ट्रातील मंदिरे सुरु करा,अन्यथा…

साहेब काळ कसोटीचा आहे पण कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे, बजरंग सोनवणे भावूक

आरक्षण हा मुलभूत अधिकार नाही- सर्वोच्च न्यायालय

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!