Share

स्वयंपाक खोलीत चहा बनविताना अचानक गॅस सिलेंडरने घेतला पेट, स्फोटात कुटुंब बचावले

Published On: 

औरंंगाबाद : स्वयंपाक खोलीत चहा बनविताना अचानक गॅस सिलेंडरने पेट घेतला. त्यामुळे काही वेळातच भीषण स्फोट झाला. ही घटना गुरुवारी (दि.८) सकाळी साडेआठच्या सुमारास संजयनगरमधील गल्ली क्र. बी-४ मध्ये घडली. त्यामुळे काही काळ याभागात खळबळ उडाली होती.

प्रणव संजय होनराव (वय २३, रा. गल्लीr क्र. बी-४, संजयनगर) यांच्या घरी कौटुंबिक कार्यक्रम होता. त्यासाठी घरातील सदस्य सकाळी आठच्या सुमारास स्वयंपाक खोलीत गॅसवर चहा करत होते. त्यावेळी अचानक गॅस सिलेंडरने पेट घेतला.

मात्र, वेळीच कुटुंबियांनी घराबाहेर धाव घेतली. त्यानंतर लगेचच सिलेंडरचा स्फोट होऊन मोठा आवाज आला. यामुळे परिसर दणाणून गेला. या घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन दलाचे विजय राठोड, रमेश सोनवणे, श्याम बमणे, अब्दुल हमीद यांनी घटनास्थळी धाव घे आग आटोक्यात आणली. या स्फोटामुळे घरातील फ्रीज, भांडी, इलेक्ट्रिक साहित्य असे सुमारे सव्वा लाखाचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेची नोंद जिन्सी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!