मुंबई : मुंबईत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पोस्टर लावले आहेत. या पोस्टरद्वारे सरकारला लसीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला आहे. ‘मोदी जी हमारे बच्चों की वैक्सीन विदेश क्यों भेज दी?’ असा प्रश्न विचारणारे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. असेच बॅनर्स काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत लावले होते. यावर कारवाई करत दिल्ली पोलिसांनी नऊ जणांना अटक देखील केली होती.या मुद्यावरून सध्या राजकारण सुरु झाले आहे.
भाजपने या मुद्यावरून आता कॉंग्रेसला लक्ष्य केले आहे. भाजपा उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष संजय पाण्डेय म्हणाले,कोरोना वैश्विक महामारीशी संपुर्ण जग लढत आहे. अशामध्ये सर्व देश एकमेकांची मदत करीत आहेत. जेव्हा भारताला आवश्यकता पडली तेव्हा ऑक्सिजन असो, व्हेंटिलेटर असो, रेमडेसिविर इंजेक्शन असो, इतकंच काय तर व्हॅक्सीन सुध्दा इतर देशांनी भारताला मदत म्हणून दिलं. व्हॅक्सीनेशनचा कच्चा माल हा परदेशातून आयात करावा लागतो आणि इंटरनॅशनल एक्सपोर्ट ऑब्लीगेशन च्या अंतर्गत तो फिनिश प्रोडक्ट एक्सपोर्ट करणं हे कंपल्सरी आहे. अशामध्ये भारताला कोरोना व्हायरसशी लढत असताना काँग्रेस नामक व्हायरसशी सुद्धा लढावं लागतं आहे.
काँग्रेस पार्टी ने आज मुंबईभर व्हॅक्सीनेशनच्या संदर्भात एक भ्रम पसरविणारे पोस्टर्स लावली आहेत. त्या पोस्टर्सचा आम्ही निषेध करतो. तो फक्त आणि फक्त भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन करण्याचा आणि भारतात भ्रम पसरविण्याचा असा हा प्रयत्न आहे. भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडी सरकारला ही अपील करते की या पोस्टर्स लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा आणि त्यांच्यावर पॅन्डामिक ॲक्टच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंद करा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांना जुन्याच भावाने खत उपलब्ध केल्याबद्दल चंद्रकांत पाटलांनी मानले मोदींचे आभार
- ‘महा विकास आघाडी कोकणातल्या शेतकरी बांधव व नागरिकांच्या सोबत खंबीरपणे उभी आहे’
- भाजपा मुंबई महानगरपालिकेविरोधात सदोष वृक्षवधाची याचिका दाखल करणार
- मोदींना चारवेळा पत्र दिले, अद्याप भेट दिली नाही; संभाजीराजेंनी व्यक्त केली नाराजी
- राजीव यांच्या निधनाने आमच्या परिवारातील एक सदस्य गेल्याचे दुःख आहे – प्रियांका गांधी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

