नाशिक : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला संभीजीराजे छत्रपती यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहेत. यातच आता खा. संभाजीराजे छत्रपती यांनी आज आपली बेधडक भूमिका मांडली आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले, त्यावर त्यांची भूमिक काय आहे, याकडे सर्वांच लक्ष होतं. त्यावरच त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत घेऊन आपली भूमिका मांडली.
मराठा आरक्षणासंदर्भात भाजपने त्यांची भूमिका घ्यावी. मी काही त्यांचा ठेका घेतलेला नाही. भाजपने मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, यावर तोडगा सांगावा, असंही संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजे म्हणाले की, ‘मी शांत आहे, ही महाराजांची शिकवण आहे. मी आक्रमक होणार याआधी मार्ग काय काढणार, हे सांगा असे ते म्हणाले.
सध्या मी महाराष्ट्र पिंजून काढतो आहे. अभ्यासू लोकांशी चर्चा करतो आहे. येत्या २७ मेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षांना भेटणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. सगळ्या आमदार आणि खासदारांना माझी वाॅर्निंग आहे, मराठी समाजाला विनंती आहे की, २७ मे पर्यंत शांत रहा असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांना जुन्याच भावाने खत उपलब्ध केल्याबद्दल चंद्रकांत पाटलांनी मानले मोदींचे आभार
- अखेर रिक्षाचालकांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्याच्या प्रक्रियेला ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात
- भाजपा मुंबई महानगरपालिकेविरोधात सदोष वृक्षवधाची याचिका दाखल करणार
- प्राजक्ताचे जबरदस्त फोटोशूट ; कॅप्शनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
- राजीव यांच्या निधनाने आमच्या परिवारातील एक सदस्य गेल्याचे दुःख आहे – प्रियांका गांधी


