मुंबई : देशासह राज्यात आजपासून (शनिवार) लसीकरणाला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यातील लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिली जाणार आहे. राज्यात पहिल्या दिवशी २८ हजार ५०० कोरोनायोद्ध्यांना लस दिली जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर १०० प्रमाणे सुमारे २८ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आलं आहे. ज्यांना लस देण्यात येणार आहे त्यांना आज सायंकाळपर्यत मेसेज पाठविण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे आत सर्वांची नजर ही लसीकरण मोहीमेवर असणार आहे.
या आनंदाच्या ऐतिहासिक क्षणाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली आहे. मुंबईत आता तरी लोकल सेवा सुरु करावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे. राजु पाटील यांनी ट्विट करत म्हटले आहे की,’उद्धव ठाकरेजी आजपासून महाराष्ट्रासोबतच देशातही कोरोना लसीकरणास सुरुवात होत आहे. आता तरी सर्वांसाठी लोकल सेवा सुरु करावी. नोकरीसाठी मुंबईकडे धावणारा मध्यमवर्ग आपली अर्धी कमाई प्रवासावर खर्च करून व वाहतूक कोंडीत रोज रोज अडकून थकला आहे.’ असे ट्विट करत पाटील यांनी लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान, देशात कोरोना महामारीचा शिरकाव झाल्यानंतर मुंबईतील लोकल बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. गेल्या 9 महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद आहे. नोकरदार वर्गावरती याचा खूप परिणाम झाला आहे. लोकल बंद असल्यामुळे सर्वसामान्यांना देखील याचा त्रास होत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने लोकल सेवा सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘खाशाबा जाधव यांनी जिंकलेलं ऑलिंपिक पदक देशाच्या खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रासाठी कायम प्रेरणास्त्रोत’
- ईशान्य भारताच्या गावागावात रिपब्लिकन पक्षाची सदस्य मोहिम सुरू आहे – रामदास आठवले
- ‘युध्दनिपुण, प्रकांड पंडित छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाला आणि शौर्याला मानाचा मुजरा’
- महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाची ४२८ पदाधिक-यांची मेगा कार्यकारिणी जाहीर
- ‘देशात शेतकऱ्यांचे राज्य पाहिजे मात्र भाजप भांडवलदारांच्या फायद्याचे कायदे करत आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

