टीम महाराष्ट्र देशा : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांची शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील हे पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देत होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. फडणवीस केंद्रीय मंत्रीपदाचा कारभार स्वीकारणार आहेत अशी चर्चा सुरु आहे, यावर उत्तर देत असताना अचानक त्यांच्या खुर्चीचा पाय तुटला. त्यामुळे त्यांचा तोल गेला. यावेळी बाजूला उभे असललेले जिल्हाध्यक्षांनी चंद्रकांत पाटलांना आधार दिला.
या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.एका माजी मंत्र्याच्या पत्रकार परिषदेत असा प्रकार घडत असेल तर सर्वसामान्यांचे कसे असा प्रश इथे उपस्थित होतो आहे.सध्या या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.काही बोलल्यावर शिंक आली तर ‘सत्य आहे’ असे म्हणतात.तर आता खुर्चीचा पाय तुटल्यावर काय म्हणणार असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
