नवी दिल्ली- अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनासाठी आता फक्त दोन दिवस शिल्लक आहेत. अयोध्येतल्या या ऐतिहासिक प्रसंगासाठी भव्य तयारी सुरू आहे. रस्ते आणि इमारती सजवल्या जात आहेत.
भूमीपूजनाचा पवित्र दिवस जवळ येत आहे. दीर्घ संघर्षानंतर हा क्षण प्रत्यक्षात येत आहे, म्हणून अभूतपूर्व तयारी सुरू आहे.रामललाच्या मंदिराचे भूमिपूजन होण्यापूर्वी अयोध्या राममय झाले आहे. मंदिरे रंगविली जात आहेत. भगवा फडकतो आहे. आजपासून भूमिपूजनाचा तीन दिवसीय विधी सुरू झाला आहे. हा विधी 5 ऑगस्टपर्यंत चालेल.
एका बाजूला ही सर्व तयारी सुरु असताना आता रोज नव्या मागण्या समोर येत आहेत.काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी टि्वटस करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अयोध्येतील राम मंदिर निर्माण भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
मोदी जी आप अशुभ मुहुर्त में भगवान राम मंदिर का शिलान्यास कर और कितने लोगों को अस्पताल भिजवाना चाहते हैं? योगी जी आप ही मोदी जी को समझाइए। आपके रहते हुए सनातन धर्म की सारी मर्यादाओं को क्यो तोड़ा जा रहा है? और आपकी क्या मजबूरी है जो आप यह सब होने दे रहे हैं?
— Digvijaya Singh (@digvijaya_28) August 3, 2020
“अशुभ मुहुर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन करुन मोदीजी तुम्ही अजून किती लोकांना रुग्णालयात पाठवणार आहात? योगीजी आत तुम्हीच मोदींना समजावा, तुम्ही असताना सनातन धर्माच्या सर्व मर्यादा का तोडल्या जात आहेत? आणि तुमची अशी काय अडचण आहे, कि, तुम्ही हे सर्व होऊ देताय?” असे दिग्विजय सिंह यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
राज्यात आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक…
राममंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा, पण कोरोनाचे भान ठेवा – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

