टीम महाराष्ट्र देशा : “मी ब्राह्मण आहे हे संपूर्ण जगाला ठाऊक आहे. पण पवारांना वारंवार याचा उल्लेख करावा लागतो यातच माझं यश आहे,” असा सणसणीत टोला राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणाऱ्या शरद पवार यांना लगावला आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, पवारच नाही तर माझ्या जातीचा उल्लेख बऱ्याच लोकांनी केला. आमच्या विरोधकांची आयुधं संपतात तेव्हा ते जातीवर येतात. माझं मत असं आहे की जात नेत्यांच्या मनात असते ती जनतेच्या मनात नसते,” असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
ते म्हणाले, ” पाच वर्षामध्ये मी काय केलं, काय नाही केलं किंवा मी नेता झालो की नाही झालो किंवा मला लोकं मानतात की नाही मानतात हे ठाऊक नाही. पण माझ्या नेतृत्वाचं एकच यश आहे ते म्हणजे स्वतः शरद पवार हे पुरोगामी नेते असूनही त्यांना प्रत्येक वेळी माझ्या जातीची आठवण करुन द्यावी लागते. ते थेट उल्लेख करु शकत नाही पण अप्रत्यक्षरित्या अनेकदा त्यांना माझ्या जातीची आठवण करुन द्यावी लागते हे माझं यश आहे. असेही ते यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ”संपूर्ण दुनियेला माहितीय मी ब्राह्मण आहे. त्यामुळेच दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची नाही पण माझ्या जातीची आठवण जरुर करु द्यावी लागते. पण जनतेने मला आहे तसं स्वीकारलं आहे. मला खरोखर असं वाटतं की महाराष्ट्राच्या या संपूर्ण राजकीय पटावर मी निश्चित माझं काहीतरी स्थान मिळवलं असेल अन्यथा वारंवार अडून अडून मी कोणत्या जातीचा आहे हे सांगण्याची गरज पवारांना तरी पडली नसती.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1204266504214044672?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1204276585026617344?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

