बीड: अज्ञात चोरट्यांनी फिल्मी स्टाईल मध्ये चालत्या टेम्पोवर चढून ताडपत्री फाडून टेम्पोतील ७२ हजार रुपयांचे एलईडी बल्ब चोरल्याची घटना समोर आली आहे. ही घटना केज – मांजरसुंबा महामार्गावरील उमरी फाट्यावर बुधवारी ( दि. १४ ) पहाटे घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
टेम्पो चालक प्रदीप मिसाळे हा वाघोली (जि. पुणे) येथून एलईडी बल्ब व ट्यूबचे ६८७ बॉक्स आयशर टेम्पोत (एम. एच. ०४ एफ यु ९५४४) भरून हैदराबादकडे निघाला होता. बुधवारी (दि. १४) पहाटे ४ ते ५.३० च्या दरम्यान टेम्पो केज-मांजरसुंबा महामार्गावरील उमरी फाट्यावर आला. टेम्पोचा वेग कमी झाल्याचे पाहून तिथेच दबा धरून बसलेले चोरटे टेम्पोवर चढले. चालत्या टेम्पोची ताडपत्री फाडून चोरट्यांनी टेम्पोतील ७२ हजार ९७ रुपयांचे एलईडी बल्ब व ट्यूब लंपास करत पोबारा केला.
केजला टेम्पो आल्यानंतर चालकाने टेम्पोची पाहणी केली तेव्हा टेम्पोवरील ताडपत्री फाटलेली दिसून आली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. टेम्पो चालक प्रदीप मिसळे यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल केला.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यातील सोसायट्यांमध्ये बाहेरच्या व्यक्तींना ‘नो एन्ट्री’, महापालिकेचा आदेश
- ‘जयंत पाटील यांच्या सभेत पाऊस आला आणि विरोधकांनी त्याचा धसकाच घेतला’
- विराट म्हणाला होता मॅक्सवेलला इडियट; मॅक्सवेलने केला खुलासा
- सुरक्षा दलांनी गोळीबार सुरु करताच ५० कोटींचे अमली पदार्थ टाकून घुसखोर पळून गेले
- जालन्यात नाकाबंदीमध्ये पकडली पाच लाखांची अवैध देशी दारू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

