मुंबई : तुमचं साहस या हिमालयाच्या उंचीपेक्षाही मोठं आहे. तुमच्या शौर्यामुळे आज जगाला भारताकडून योग्य संदेश गेला आहे. तुमचं धैर्य जगाने पाहिलं आहे. तुमच्या त्यागामुळेच आज आत्मनिर्भर भारताचं स्वप्न आम्ही पाहात आहोत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखच्या सीमेवर तैनात भारतीय सैन्याशी संवाद साधला.
‘मराठा-कुणबी समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोक-या तसेच रोजगार उपलब्ध करून देणार’
भारत आणि चीन यांच्यातील वाद वाढत चालला आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लेह-लडाखला पोहचले. सीमेजवळील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मोदी शुक्रवारी सकाळी अचानकच लडाखला गेले. तिथे लष्करी अधिकारी आणि जवानांशी संवाद साधताना मोदींनी भारताच्या कणखरतेविषयी थेट शब्दांत संदेश दिला. ‘विस्तारवाद्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे, हा इतिहास आहे,’ अशा थेट शब्दांत मोदींनी चीनवर निशाणा साधला.
‘भेदरलेले भाजप सरकार प्रियांका गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे’
पंतप्रधानांच्या या दौऱ्यावर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लेहमध्ये पोहोचले. देशाचे प्रधानमंत्री यांनी आपल्या जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी थेट भारत चीन सीमेवर लेह-लडाखला जाऊन भारतीय लष्कर, हवाईदल आणि आयटीबीपीच्या जवानांशी संवाद साधला. धाडसी होऊन रणांगणावर स्वतः जाऊन सैन्यबांधवांना प्रेरीत करणे… याला म्हणतात…. प्रखर … जबर… राष्ट्रप्रेम !!वंदे मातरम्!! बलशाली भारताचे कणखर नेतृत्व.. मोदी जी. अशा भावना नितेश राणे यांनी व्यक्त केल्या आहेत.

