Share

‘व्हाटसऍप युनिव्हर्सिटीच्या टॉपर ताईंनी बदामाचा खुराक चालू करावा तर डोक्याला चालना मिळेल’

Published On: 

मुंबई : दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट उघडकीस आणला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 2 पाकिस्तानी नागरिकांसह एकूण सहा दहशतवाद्यांना यांसदर्भात अटक केली. दिल्लीमध्ये काल 6 दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याची माहीती मिळाली अन् राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान यावरूनच भाजपने यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘दिल्ली पोलिस येऊन मुंबईतली आतंकवादी पकडत आहेत. मग आपली पोलिस फौज सरकारने १०० कोटी मोजायला बसवलीये का ?’ असा सवाल चित्रा वाघ यांनी केला होता. यावर आता राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.

‘अशा रीतीने ताईंची बौद्धिक पातळी किती सुमार दर्जाची आहे हे दिसून येत आहे. महाराष्ट्र द्वेषाने ह्या ताईंना एवढं पछाडलं आहे की हे दहशदवादी दिल्लीत पकडले असताना त्यांना महाराष्ट्रात पकडलं असल्याचं बरळत आहेत. व्हाटसऍप युनिव्हर्सिटीच्या या टॉपर ताईंनी उद्यापासून बदामाचा खुराक चालू करावा म्हणजे बुद्धीला लागलेला गंज कमी होऊन त्यांच्या डोक्याला योग्य ती चालना मिळेल.’ असे ट्वीट करून चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!