Share

पबजी बॅनवर ‘अमुल’ च खास डूडल होतंय प्रचंड व्हायरल

Published On: 

मुंबई: ‘अमुल’ हे देशातील सर्वात मोठे दूध उत्पादक समूह त्यांच्या खास जाहिरातींसाठी प्रसिद्ध आहे. देशाशी निगडित कोणतीही खास बाब घडली कि लगेच अमुल आपल्या पद्धतीने ती लोकांसमोर मांडत असते. मग क्रिकेट असो, देशाच्या सैनिकांप्रती असो वा संशोधन सर्वच घटनांना योग्य रित्या अमुल मांडत असते.

दरम्यान, भारत-चीन तणाव गेले अनेक महिने वाढतच असून चीनच्या कुरघोडी अजूनही सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताने आत्मनिर्भरतेच नारा लगावत चिनी वस्तूंसह ऍप्सवर डिजिटल स्ट्राईक करण्यास सुरुवात केली होती. याआधीच टीकटॉक, शेअर इट सारख्या १०० हुन अधिक ऍप्सवर सुरक्षिततेचा ठपका लावत बॅन करण्यात आले होते.आता, केंद्रीय माहिती संचनालाय आणि तंत्रज्ञान विभागाने आणखी एक मोठे पाऊल उचलले असून जगातील सर्वात लोकप्रिय गेम्स पैकी एक असलेल्या पबजी(PUBG) सह इतर ११८ ऍप्सवर बंदी आणली आहे. यामुळे देशातील करोडो युवकांसह गेमर्सना धक्का बसला आहे.

शेतकरी मित्राना पाठबळ द्या, खासदार भावना गवळीनचा ‘या’ संस्थेला निर्देश

अमुलने याच पार्श्वभूमीवर खास फोटो शेअर केला असून त्यातून पबजी बॅनचा संदेश दिला आहे. ‘सब्जी? हां जी, पब जी? ना जी! असे वाक्य असून अमुलच्या डूडलमधली मुलगी चिडलेली दिसत आहे. यातून चिनी ऍप्सवर बंदीला समर्थन केले गेले आहे.

गृहमंत्रीच विसरले शिवछत्रपतींचे नाव ? शिवप्रेमींच्या संतप्त प्रतिक्रिया…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!