🕒 1 min read
मुंबई : राज्यात मंगळवारी (दि. ९) १६६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ६३८ झाली आहे. दरम्यान, काल कोरोनाच्या २२५९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४४ हजार ८४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ७७ हजार ८११ नमुन्यांपैकी ९० हजार ७८७ नमुने पॉझिटिव्ह (१५.७१ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६८ हजार ०७३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ९३० खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ४७० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज १२० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे : ठाणे- ८३ (मुंबई ५८, ठाणे १३, मीरा-भाईंदर ६, पनवेल ३, नवी मुंबई १, वसई-विरार २), नाशिक- ३ (नाशिक ३), पुणे- १८ (पुणे १६, सोलापूर २), कोल्हापूर- १ (रत्नागिरी १),औरंगाबाद-१० (औरंगाबाद १०), अकोला -३ (अकोला २, अमरावती १), नागपूर-१ (नागपूर १), इतर राज्य-१ (मध्ये प्रदेशातील एका व्यक्तीचा मृत्यू नागपूरमध्ये झाला आहे.)
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८० पुरुष तर ४० महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६२ रुग्ण आहेत तर ४७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. या १२० रुग्णांपैकी ९१ जणांमध्ये (७५.८ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३२८९ झाली आहे.
आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ११ मे ते ६ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७१ मृत्यूंपैकी मुंबई ४५, ठाणे -११,मीरा भाईंदर -६, औरंगाबाद – ३, पनवेल -२, नाशिक -१, रत्नागिरी -१, वसई विरार -१ व इतर राज्यातील १ मृत्यू आहे.
रत्नागिरीसाठी वैद्यकीय महाविद्यालयही देऊ – मुख्यमंत्री
हे युध्द जिंकणारच : राज्यात रुग्णवाढीचा दर ७ वरून ४.१५ टक्क्यांवर
कुठे गेले अच्छे दिन ? पेट्रोल-डीझेलचे दर भिडले गगनाला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
