Share

महाराष्ट्रात काय चाललंय?, प्रश्नावर फडणवीसांचे मिश्कील उत्तर, म्हणाले…

Published On: 

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मध्यप्रदेशांत ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा सुरु होती. त्यानंतर कॉंग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा काल (ता. १० ) राजीनामा दिल्यानंतर मध्य प्रदेशात राजकीय भूकंप झाला. शिंदे यांच्यासोबत त्यांच्या १९ आमदारांनीही राजीनामा दिल्यामुळे अपक्षांच्या पाठिंब्याने चालणारं काँग्रेस सरकार अल्पमतात आलं आहे. आता ज्योतिरादित्यांनी भाजपची वाट धरल्यामुळे ‘कमलनाथ जाणार आणि ‘कमळ’ उमलणार’ असं चित्र आहे.

या घटनेने मध्यप्रदेशात ऑपरेशन लोटस सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. यासंबधी आज महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले असता, फडणवीस यांनी ‘बघुया काय होतंय’ असं मोघम उत्तर दिलं. मात्र ‘महाराष्ट्रात काय चाललंय?’ असा प्रश्न विचरल असता त्यांनी ‘महाराष्ट्रात तर अधिवेशन चाललंय’ असं मिश्किल उत्तर देत फडणवीसांनी प्रश्नाच उत्तर द्यायचं टळले.

दरम्यान, मध्यप्रदेशात जोतीरादित्या शिंदे यांनी राजीनामा दिल्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे. अशातच राज्यातील महाविकास आघाडी सरकारलाही येणाऱ्या काळात असे धक्के बसण्याची शक्यता विरोधी पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले वर्तविली आहे. मात्र सध्या तरी महाविकास आघाडीचे नेते सरकारला कोणतीही भीती नसल्याची निश्चिंती व्यक्त करत आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशात नेमकं काय घडणार आणि महाराष्ट्रात त्याचे पडसाद कसे उमटणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!