Share

जाणून घ्या PSI पदाच्या जाहिरातीवर धनगर, वंजारी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचा काय आहे आक्षेप?

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने पुन्हा एकदा समांतर आरक्षणाच्या आडून वंजारी आणि धनगर समाजाच्या परीक्षार्थींवर पुन्हा एकदा अन्याय केल्याचा गंभीर आरोप होत आहे. शुक्रवारी याच मुद्यावरून पुण्यात या दोन्ही समाजाच्या एमपीएससी परीक्षार्थींनी तीव्र आंदोलन केलं.

MPSC कडून धनगर, वंजारी समाजावर पुन्हा अन्याय करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. PSI च्या जाहिरातीत धनगर समाजाला अवघ्या 2 जागा तर वंजारी समाजाच्या नशिबी पुन्हा एकदा भोपळा आला आहे. यामुळे पुण्यात धनगर आणि वंजारी समाजाचे विद्यार्थी पुन्हा एकदा एमपीएससी विरोधात आक्रमक बनले आहेत. कारण पीएसआयच्या 650 जागांच्या जाहिरातीमध्ये या दोन्ही प्रवर्गांना पुन्हा एकदा वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर पीएसआय ‘एसटीआय आणि एएसओ पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यात राज्य सरकार PSI च्या ६०५ जागा भरणार असल्याचे नमूद केलं आहे. त्यानुसार NT प्रवर्गासाठी साडेतीन टक्क्याने २२ जागा असणं गरजेचं आहे. पण त्यात फक्त २ जागा NT प्रवर्गासाठी दिल्या आहे. त्यामुळे उरलेल्या २० जागा कुठे गेल्या? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

धनगर, वंजारी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचा आक्षेप

650 जागांपैकी 475 जागा विविध प्रवर्गांसाठी आरक्षित केलेल्या आहेत. शासन निर्णयाप्रमाणे यापैकी दोन टक्के जागा एनटी – ड (भज – ड) प्रवर्गासाठी आरक्षित असणं अपेक्षित होतं. परंतु या प्रवर्गासाठी जाहिरातीत एकही जागा आरक्षित करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे एनटी – क (धनगर) प्रवर्गासाठी आरक्षित जागांपैकी 3.5 टक्के जागा आरक्षित असायला हव्या होत्या, परंतु या प्रवर्गासाठी केवळ दोन जागा देण्यात आल्या आहेत.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!