Share

फेसबुक व व्हॉट्सअॅप आता एका क्लिकवर

Published On: 

🕒 1 min read

सोशल माध्यमावर वेळ घालविताना अनेक अडचणी येतात. कित्येक टॅब एकाच वेळेस ओपन कराव्या लागतात.यामुळे फोनवर फार लोड येतो.अनेक लोक एकापेक्षा अनेक सोशल माध्यमे वापरतात.अशा वेळी एका सोशल साईड वरून दुसऱ्या सोशल माध्यमावर जाणे फार जिकरीचे होते.

फेसबुक वरून व्हॉट्सअॅपचे शॉर्टकट जाता आले तर किती बरे होईल ना?फेसबुकने अगदी काही दिवसापूर्वी इन्स्टाग्राम व फेसबुक जोडले होते. आता त्याप्रमाणे व्हॉट्सअॅपचे शॉर्टकट बटण देण्यात येणार आहे.

फेसबुकच्या अॅपवरच आता व्हॉट्सअॅपचे शॉर्टकट बटण देण्यात येणार आहे. यासाठी सध्या फेसबुककडून चाचणी घेण्यात येत आहे. या बटणाच्या मदतीने फेसबुक वापरकर्त्यांना एका क्लिकवर व्हॉट्सअॅप सुरु करता येईल.

अमेरिकेतील प्रसिद्ध संकेतस्थळ असलेल्या ‘द नेक्स्ट’ने याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. यानुसार, फेसबुक अॅपच्या मेन्यूमध्ये व्हॉट्सअॅपसाठीचे शॉर्टकट बटण दिले जाणार आहे. सध्या याची चाचणी सुरु आहे. फेसबुकचे अँड्रॉईड अॅप वापरणाऱ्या काहींसाठी सध्या हे फिचर उपलब्ध आहे.

सध्या हे बटण डॅनिश भाषेत आहे. मात्र फेसबुकने या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
फेसबुकवर व्हॉट्सअॅपसाठीचे शॉर्टकट बटण दिले गेल्यास त्याचा मोठा फायदा दोन्ही सुविधांचा वापर करणाऱ्यांना होईल. यामुळे फेसबुक अॅप बंद न करता फक्त एका क्लिकवर व्हॉट्सअॅपवर जाता येईल. याचा फायदा फेसबुक आणि व्हॉट्सअॅप या दोन्ही सेवांना होणार आहे.

या फिचरमुळे फेसबुक आपली सहयोगी कंपनी असलेल्या व्हॉट्सअॅपचे वापरकर्ते वाढवू शकते. याशिवाय केवळ व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांनाही फेसबुककडे वळवण्याचा कंपनीचा प्रयत्न असू शकतो.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!