🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मिडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. सुहाना अनेकदा तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते. ज्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहते. तिचे सोशल मिडियावर लाखोंचं फॅन फलोइंग असून, तिच्या व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओवर सेलिब्रिटीला लाजवतील इतक्या कॉमेंट्स असतात. २२ मे रोजी सुहानाच्या वाढदिवसनिमित्त तिची आई गौरी खानने सोशल मीडियावर सुहानाचा एक सुंदर फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या, मात्र सध्या यावर आलेल्या एका कमेन्टची जोरदार चर्चा होत आहे.
Happy birthday.. you are loved today , tomorrow and always ❤️ pic.twitter.com/dgXRGjk8FK
— Gauri Khan (@gaurikhan) May 21, 2021
गौरीने ट्विटवर एक फोटो शेअर करत सुहानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गौरीचे ट्वीट पाहताच एक नेटकरी म्हणाला, “गौरी मॅम माझं लग्न सुहानाशी लावून द्या. माझा एक महिन्याचा पगार हा १ लाख पेक्षा जास्त आहे.” या नेटकऱ्याची कमेंट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. सुहानाच्या हातात असलेली बॅग ही २.५ लाखाची आहे असे म्हणतं अनेकांनी त्या नेटकऱ्याला ट्रोल केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मनोज वाजपेयी यांनी ‘द फॅमिली मॅन २’ वादासंदर्भात जारी केले निवेदन; पोस्ट शेअर करत दिले स्पष्टीकरण
- ‘हेमा मालिनी एक महान कलाकार आहे’; सावत्र नातवाने केले कौतुक
- होम आयसोलेशनवर बंदी घालण्याचा निर्णय अव्यवहार्य; पुण्याच्या महापौरांनी व्यक्त केली नाराजी
- ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला मिळणार बळ,राज्य सरकारने केला ‘हा’ आदेश जारी
- ‘बाप लेकीची मिठी जी चिरंतन राहील’; विलासरावाच्या जयंतीनिमित्त जेनेलियाची भावुक पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
