लांजा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे त्यांची जनआशीर्वाद यात्रा स्थगित झाली होती. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आता पुन्हा एकदा राणे जनतेचा आशीर्वाद मागायला जात आहेत.
नारायण राणे यांनी रत्नागिरीमधील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी देखील आता शिवसेनेसह महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. नारायण राणे यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे अज्ञान उघड केले म्हणून एवढा मोठा थयथयाट केलात का?, असा सवाल शेलार यांनी करत राणेंच समर्थन केलं.
पुढे त्यांनी ‘हम किसी को छेडेंगे नहीं, कोई हमको छेड़ेगा तो उसको छोड़ेंगे नहीं’ अशी गर्जना करतानाच इशारा देखील दिला आहे. यासोबतच, मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक आणि शिवसेनेने केलेला तमाशा याचे खरे कारण काय होते? मुख्यमंत्र्यांचे अज्ञान राणें यांनी उघड केले म्हणून एवढा राग आला का? असे सवाल देखील शेलार यांनी लांजा येथे संवाद सभेत बोलताना केले.
याच महिन्यात मंत्रालयासमोर सुभाष जाधव या शेतकऱ्यांने आत्महत्या केली. तर इंदापूरचे शिवाजी चितळकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या सभेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर पालघरमध्ये आदिवासी काळू पवार याने पाचशे रुपयाचे मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी कर्ज घेतले, त्या प्रकरणी छळ झाला म्हणून आत्महत्या केली. या घटनांतून राज्य सरकारविषयी असलेला असंतोष प्रकट होऊ लागला आहे. या घटनांवरून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी राणे यांना अटक आणि अशा घटना घडवल्या जात आहेत, असा गंभीर आरोप देखील आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आता भाजप ऍक्शन मोडमध्ये; अनिल परब यांच्याविरोधात याचिका दाखल करण्याचं काम सुरु
- ‘भुजबळ, धनंजय मुंडे हे ओबीसी आरक्षणाबाबत तोंडाला डिंक लावून गप्प बसतात’
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीये, मी एकटाच कधीपर्यंत लढू? – अण्णा हजारे
- मोठी बातमी : राज्यातील आणखी एका जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश
- आत्मनिर्भरता : देशाची सुरक्षा अधिक ‘भारतीय’ होण्यासाठी डीआयएटी प्रयत्नशील – संरक्षण मंत्री


