मुंबई : मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना १० लक्षांची मदत अन कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नौकरीचे आश्वासन लेखी पत्राद्वारे देण्यात आले होते. मात्र या आश्वासनाचा सरकारला विसर पडला होता. आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून वेळोवेळी विविध मराठा संघटना, मोर्च्याकडून मागणी करण्यात आली होती. यामध्ये शिवसंग्रामचा देखील सहभाग होता. विधिमंडळ अधिवेशनात आ विनायक मेटे यांनी याबाबत लक्षवेधी मांडल्यानंतर काही कुटुंबाना ५ लक्षांची मदत करण्यात आली होती. यातील काही कुटुंबियांना काहीच मदत करण्यात आली नव्हती. मात्र उर्वरित आश्वासनांचा विसर पडला. आ विनायक मेटे यांनी त्यानंतरही सातत्याने या मागणीचा पाठपुरावा सुरु ठेवल्यानंतर काल दुपारी ३ वाजता मंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनात याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ मेटे यांनी दिलेल्या आश्वासन पूर्ततेचा जाब विचारत कधी पूर्ण केले जाणार हि मागणी लावून धरली.
ज्या कुटुंबांना अर्धवट मदत केली आहे त्यांना उर्वरित आर्थिक मदत, शासकीय सेवेत संधी द्यावी व ज्यांना काहीही केली नाही त्यांना पूर्णपणे मदत व शासकीय सेवेत संधी द्यावी याबाबत आग्रह धरला. मंत्री एकनाथ शिंदे यांना सर्व माहिती, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबियांना लेखी देण्यात आलेले पत्रे हे सर्व आ मेटे यांनी समोर मांडले. मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी येत्या ५ ऑगस्ट पूर्वी बाकी राहिलेला ५ लक्षांचा निधी देण्याचे आश्वासन दिले तर येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्था व परिवहन खात्यात आत्मबलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांच्या एका सदस्यास नौकरीच्या आश्वासन दिले.
ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याबाबत दक्षता, पुण्यातील बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सूचना
शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायक मेटे यांच्याकडून सातत्याने मराठा आरक्षण, सारथी संस्था, आरक्षणासाठी आत्मबलिदान दिलेल्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु असतो. आरक्षणाच्या मागणी काळात ४२ पेक्षा अधिक मराठा समाजबांधवांनी आपल्या प्राणाची आहुती आरक्षणासाठी अर्पण केली होती. तत्कालीन राज्य शासनाने या आत्मबलिदान दिलेल्या समाजबांधवांच्या कुटुंबियांना १० लक्ष मदत व कुटुंबातील एकास नौकरीचे आश्वासन लेखी दिले होते. याबाबतची पत्रे देखील जिल्हा प्रशासनाने दिली होती. मात्र सरत्या काळात या आश्वासनचा सरकारला विसर पडला. विनायक मेटे यांनी याबाबत विधिमंडळात राज्य सरकारला धारेवर धरत आठवण करून दिली. तेव्हा कुठे लक्षांची मदत करण्यात आली मात्र तद्नंतरही उर्वरित मदत व नौकरी संदर्भात शासनाने हात वर केले.
विनायक मेटे यांनी याबाबत राज्य सरकारला वेळोवेळी निवेदन, लक्षवेधीच्या माध्यमातून हे आश्वासन पूर्ण करण्याची मागणी केली होती. काल झालेल्या बैठकीत या मागणीला मंत्रीही एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या ५ ऑगस्ट पूर्वी बाकी राहिलेला ५ लक्षांचा निधी देण्याचे आश्वासन दिले तर येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्था व परिवहन खात्यात आत्मबलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांच्या एका सदस्यास नौकरीच्या आश्वासन दिले. यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधी, आत्मबलिदान दिलेल्यांच्या कुटुंबातील सदस्य आदींची उपस्थिती होती.
राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या पोहोचली अडीच लाखांवर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

