Share

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या पोहोचली अडीच लाखांवर

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाचे आज ८८६० रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४८ हजार ६१५ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.३७ टक्के आहे. आज ११,१४७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४८ हजार १५० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आज निदान झालेले ११,१४७ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २६६ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१२०८ (५३), ठाणे- २६६, ठाणे मनपा-२४२ (६),नवी मुंबई मनपा-३७३ (१०), कल्याण डोंबिवली मनपा-३५७ (६),उल्हासनगर मनपा-७२ (४), भिवंडी निजामपूर मनपा-२७ , मीरा भाईंदर मनपा-१६४ (४),पालघर-१०८, वसई-विरार मनपा-२६६ (५), रायगड-२४५ (६), पनवेल मनपा-१७१ (२), नाशिक-१७० (२), नाशिक मनपा-३१९ (७), मालेगाव मनपा-१४, अहमदनगर-२५४ (४),अहमदनगर मनपा-२१० (३), धुळे-३३, धुळे मनपा-३४ (१), जळगाव-२५६ (७), जळगाव मनपा-११९ (१), नंदूरबार-१५ (१), पुणे- ४३३ (२१), पुणे मनपा-१८८९ (५२), पिंपरी चिंचवड मनपा-९८७ (१०), सोलापूर-२२७ (५), सोलापूर मनपा-९७ (५), सातारा-२०८ (१०), कोल्हापूर-३४८ (१), कोल्हापूर मनपा-४७ (२), सांगली-८६ (२), सांगली मिरज कुपवाड मनपा-१६६ (१), सिंधुदूर्ग-२, रत्नागिरी-२५ (५), औरंगाबाद-२५२, औरंगाबाद मनपा-१६६ (६), जालना-५०, हिंगोली-१०, परभणी-६४, परभणी मनपा-४ (१), लातूर-९२ (२), लातूर मनपा-३९ (२), उस्मानाबाद-९९ (३), बीड-६१, नांदेड-७४ (७), नांदेड मनपा-७७ (४), अकोला-५३, अकोला मनपा-१३, अमरावती-२, अमरावती मनपा-१४८ (१), यवतमाळ-२८, बुलढाणा-२५ (१), वाशिम-९ (१), नागपूर-१४७ , नागपूर मनपा-१९५ (२), वर्धा-१५, भंडारा-२४, गोंदिया-१२, चंद्रपूर-१७, चंद्रपूर मनपा-५, गडचिरोली-१४, इतर राज्य १४.

बहिणीने प्रेमाने पाठवलेली राखी भावापर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २० लाख ७० हजार १२८ नमुन्यांपैकी ४ लाख ११ हजार ७९८ नमुने पॉझिटिव्ह (१९.८९ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४ हजार १४१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४० हजार ५४६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५८ टक्के एवढा आहे.

चंद्रकांत दादांचा यू-टर्न म्हणाले,शिवसेनेबाबतच्या माझ्या ‘त्या’ वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!