Share

‘पुन्हा सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – शिवसेनेचा दसरा मेळावा मंगळवारी मुंबई येथे पार पडला. यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी युतीचं सरकार आलं तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं.

पुढे बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना मला कर्ज माफी नाही कर्ज मुक्ती द्यायची आहे. युतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना सातबारा कोरा करणार असल्याचं ठाकरे म्हणाले. तसेच राम मंदिर हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. राम मंदिर आमच्या आस्थेचा मुद्दा आहे अयोध्येत राम मंदिर व्हावं, ही बाळासाहेबांची इच्छा होती, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी पुढे बोलताना राज्यातील नागरिकांना दहा रुपयात पूर्ण अन्न उपलब्ध करुन देणार, रोगराई वाढतेय त्यामुळे एक रुपयात प्राथमिक आरोग्य चाचण्या आणि त्यांची केंद्रे संपूर्ण महाराष्ट्रभर उभारणार, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा देणार, 300 युनिटचा घरगुती वीज वापराचा दर 30 टक्क्यांनी कमी करणार असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, ठाकरे यांनी ‘ पर्यंत आम्ही काँग्रेसचे टार्गेट आहोत, तोपर्यंत तेही आमचे टार्गेट राहणार काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनो आमच्या विजयाचे पेढे खाण्यासाठी ताजेतवाने राहा अजित पवारांच्या कर्माने त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, आजपर्यंत मगरीच्या डोळ्यात असं पाणी पाहिलं होतं असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावला.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181579804883079168?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!