🕒 1 min read
मुंबई : काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर, शिवसेना खासदार संजय राऊत हे पवारांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी सवांद साधाल होता. महाविकास आघडी स्थापन झाल्यापासून काँग्रेसमुळे तणाव अधिक वाढत असून काँग्रेसला डच्चू देत भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष येण्याची शक्यता आहे का ? असा सवाल संजय राऊत आला. यावर त्यांनी ‘अशी स्वप्नं पडणं हा आजार आहे. असे काही होणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष चालेल,’ असं उत्तर त्यांनी दिले होते.
यावर आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या मुद्द्यावर राऊतांना फटकारले आहे. आम्ही दिवा स्वप्न पाहत नाही. आमचं स्वप्न 2024ला पूर्ण करू, असा टोला रावसाहेब दानवे यांनी राऊतांना लगावला आहे. रावसाहेब दानवे यांनी आज एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘अशा प्रकारचा प्रश्न कुणाला पडला आणि कुणाला अशी स्वप्न पडतात ते आम्हाला माहीत नाही.
पण कोणत्याही प्रकारचे दिवा स्वप्न पाहायचे नाही, हे भाजपने ठरवले आहे. इतरांनी अशी स्वप्ने अनेक वर्षे पाहिली आहेत, असा चिमटा काढतानाच आमचा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आम्ही कार्यकर्त्यांच्या जोरावर जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत त्यांना आमचं स्वप्न पूर्ण करून दाखवू. इतकेच काय 2024च्या निवडणुकीत आम्ही आमचं स्वप्न पूर्ण करू,’ असा टोला दानवे यांनी राऊत यांना लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनामुळे वैधव्य आलेल्या महिलांना विशेष पॅकेजसाठी पाठपुरावा करणार-खा.सुप्रिया सुळे
- भाजपाला शह देण्यासाठी मायावती सक्रिय, ‘बसपा’ अयोध्येत ब्राह्मण संमेलन भरवणार
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 60 लाख व्यक्ती बाधित होतील ; आरोग्यमंत्री टोपेंचा अंदाज
- निलंबित सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा, विभागीय चौकशी ९० दिवसात दाखल न केल्यास मिळणार न्याय
- संसदेच्या अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; ३३ पक्षांच्या ४० नेत्यांची उपस्थिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
