Share

कुठलीही जातीय भावना दुखावली जाणार नाही, याची काळजी घेतली आहे : अमोल कोल्हे

Published On: 

पुणे : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका शेवटच्या टप्प्यावर असतानाच माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी ही मालिका थांबिण्याची मागणी केली आहे. तसंच स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील छत्रपती संभाजी महाराजांवरचे जे चित्रण सध्या प्रसारित केलं जात आहे ते मनाला न पटणारं आहे. एका राजाचं असं चित्रीकरण पाहताना मन हेलावून जात असल्याच त्यांनी यावेळी सांगितले.

परंतु, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत संभाजी महाराजांची व्यक्तीरेखा साकारणारे अभिनेते अमोल कोल्हे यांनी यासंबंधी स्पष्टीकरण दिले आहे. त्यासंदर्भाने अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे की, मालिकेतील चित्रीकरणामुळे कुठलीही जातीय भावना दुखावली जाणार नाही, याची काळजी आम्ही घेतली आहे. संभाजी महाराज यांचा इतिहास जनतेला कळायला हवा. या विषयावर राजकारण होवू नये,अशी आमची अपेक्षा आहे. अजून खोतकर यांच्याशी मी स्वतः बोलणार आहे.’ असे त्यांनी यावेळी संगीतले आहे.

तसेच ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिका काही दिवसांत संपणार आहे. मालिकेत सद्या संभाजी महाराजांना पकडल्याचा प्रसंग दाखवण्यात येत आहे. यात संभाजी महाराजांना हाल हाल करून मारल्याचे आम्ही पाहू शकत नाही, त्यामुळे तो प्रसंग दाखवू नये असे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वीही काही दिवसांपूर्वी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका राजकीय दबावामुळं बंद करण्यात येत आहे, अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं होतं. यावरुनच मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!