मुंबई : भारतीय हवामान शास्त्र विभागाने मान्सूनची यावर्षीची केरळमधील दाखल होण्याची तारीख जाहीर केली असून, त्या तारखेनुसार मान्सून केरळमध्ये ५ जून रोजी दाखल होईल.देशातील चार महिन्यांचा मान्सून हंगाम १ जूनपासून सुरु होतो. मान्सून सर्वात पहिल्यांदा केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर तो पुढे सरकत जुलैमध्ये देशाचा उत्तर भाग व्यापतो.
मान्सूनच्या आगमनाची तारीख १ जूनच आहे. यात काही बदल करण्यात आलेला नाही. केरळनंतर पुढे म्हणजे तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओरिसा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशमध्ये मान्सून दाखल होण्यास काहीसा विलंब होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे0
अखेर महापालिकेचे वर्ल्ड रेकॉर्ड ढोल वादन रद्द! .
मान्सूनच्या परतीच्या प्रवासातही बदल होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. परतीच्या पावसाची तारीख १५ ऑॉक्टोबरच ठेवण्यात आली आहे. म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी मान्सून संपुर्ण देशातून माघार घेईल. यात काही बदल करण्यात आलेला नाही.
मान्सून मुंबईत दाखल होण्याची तारीख १० जून होती. आता ती ११ जून आहे. मान्सून मुंबईतून ८ ऑक्टोबर रोजी आपला परतीचा प्रवास सुरु करेल. परतीच्या पावसाची यापूवीर्ची तारीख २९ सप्टेंबर होती.
अजब, गजब बालभारती, आता तिनावर एक एकतीस नाही ..तर तीस आणि एक
राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ३ लाख १० हजार पास वाटप,तर ९६ हजार गुन्हे दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
