पुणे: भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी अमरावती दौऱ्यावर मुख्यमंत्री ठाकरेंवर सडकून टीका केली होती. त्यांनी यावेळी मी चंद्रकांत पाटलांना चंपा म्हणणं योग्य नाही, असे म्हणत आम्ही समोरुन कोथळा काढतो, पाठीमागून नाही. त्यामुळे पाठीमागून वार करण्याची आमची परंपरा नाही. शब्द फिरवणे हे तुम्हाला जमते आम्हाला नाही. असे प्रतिउत्तर संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना दिले आहे.
त्यावेळी भाजपचे १०५ आमदार होते. भाजपला वाटले त्यांचा मुख्यमंत्री येईल मात्र तसे काही झाले नाही. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते की, विधानसभा निवडणुकी आधी आमच्यासोबत युती केली, मोदींच्या नावाने मते मिळवली मात्र निकाल लागताच काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत हाथ मिळवणी करायची. याला विश्वासघात म्हणतात. आणि विश्वासघात म्हणजेच पाठीत खंजीर खुपसणे असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरेंनीच विश्वासघात करत आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. असा घणाघात त्यांनी केला होता. यावरच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या खासदार संजय राऊत यांनी राज्यात जरी तीन पक्षाचे सरकार असलं तरी मुख्यमंत्री ज्यांचा असतो त्यांच सरकार असतं. सरकार आपलं आहे. असे म्हटले आहे. यावरून त्यांनी सेनेचे महाविकास आघाडी मधील महत्व अधोरेखित केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांत पाटलांच्या नावाने वनविभागाची २०० कोटींची जमीन हडपण्याचा प्रयत्न
- आरोपीच्या सांगण्यावरून पीडितेला मदत न मिळू देणे, हेच का साहेबांचे महिला धोरण ?
- मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाच अनेक सरकारी मालमत्ता भाडेतत्वावर दिल्या होत्या – भाजप
- हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – पडळकर
- एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश

