पुणे : पुण्यात विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राम्हण महासंघाच्या वतीने त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना गोखलेंनी भाजप-शिवसेना युतीवर भाष्य केले होते. शिवसेना-भाजप एकत्र येण्यासाठी माझे प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले होते. या वक्तव्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आमचे राजकीय किंवा बेगडी प्रेम नाही ! बाळासाहेबांवरील आमचे प्रेम हे त्यांच्या कर्तृत्व आणि श्रद्धेपोटी आहे. सध्याच्या शिवसेनेची काम करण्याची पद्धत आणि त्यांचा व्यवहार यामुळे आम्हाला या शिवसेनेसोबत एकत्र येण्याची इच्छाच नाही ! pic.twitter.com/3Gvo97oWrY
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) November 15, 2021
शिवसेना-भाजप एकत्र येण्याची आमची इच्छाच नाहीये. आणि आम्हाला शिवसेनेबरोबर निवडणुकाही लढवायच्या नाहीत असे ते म्हणाले आहेत. बाळासाहेबांबद्दलच माझं प्रेम हे राजकीय प्रेम नाही. शिवसेना आणि भाजप एकत्र येण्यासाठी तर हे प्रेम बिलकुलच नाही. प्रेम हे त्यांच्या कर्तृत्वामुळे श्रद्धेपोटी आहे. मी मुंबईत राहतो त्याठिकाणी चारही बाजूने मुस्लिम एरिया आहे. दंगे होयचे तेव्हा शिवसेना आम्हाला सुरक्षित ठिकाणी नारळवाडीत घेऊन जायची. ती शिवसेना आणि या शिवसेनेत फरक असल्याचे चंद्रकांत पाटील यावेळी सांगितले आहे.
दरम्यान, कंगना रानौतने हे म्हणायला हरकत नाही की, मोदीजी आल्यापासून आम्हाला स्वातंत्र्याचा अनुभव आला. तिने १९४७ च्या स्वातंत्र्यावर टीका टिपण्णी करण्याचं काहीच कारण नाही. गोखले म्हणालेत तर देवेंद्र आणि आपण मिळून टॅली करून घ्यायला हरकत नाही. त्यात आम्हाला आमची कोणतीही चूक वाटत नाही. आमच्या १०५ जागा यांच्या ५६ मग मुख्यमंत्री कोण होयला पाहिजे हे सगळ्यांना माहीत आहे. आम्ही ताकदीने निवडणूक लढतो म्हणून एवढ्या जागा निवडून आणतो, असेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- घुसखोरांना बाहेर काढणार, योग्य लाभार्थ्यांनाच हक्काचे घर मिळवून देणार- चंद्रकांत खैरे
- किरण रावशी घटस्फोटानंतर पुन्हा एकदा सिंगल झाला आमिर खान
- भाजप नेत्यांचं दंगे घडवण्याचं षडयंत्र, पैसेही वाटले; मलिकांचा खळबळजनक आरोप
- ‘महात्मा ज्योतीराव फुले’ योजनेचा वैजापूरातील ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ
- आता राष्ट्रवादीही मनपा निवडणुकीच्या रिंगणात, औरंगाबादेत स्वबळाची चाचपणी


