Share

इम्रान खान म्हणतात, पाकिस्तानमध्ये आम्ही लॉकडाउन करु शकत नाही

Published On: 

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसची प्रकरणे जगभरात झपाट्याने वाढत आहेत. अहवालानुसार हा विषाणू 170 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे आणि यामुळे आतापर्यंत 11 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे तीन लाख लोकांना याचा संसर्ग झाला आहे. भारतातही त्याच्या संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्ये लॉकडाऊन झाले आहेत. परंतु पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लॉकडाऊन लागू करणे पाकिस्तानात शक्य नसल्याचं सांगितलं आहे.पूर्ण लॉकडाउन करणं म्हणजे कर्फ्यू लागू करणे. लोकांना जबरदस्ती घऱाच्या आत राहण्यास भाग पाडणे. आमच्या देशातील 25टक्के जनता ही दारिद्र्य रेषेखाली जगत असून रोजंदारीच्या कमाईवर आपलं पोट भरते. आम्ही आमची स्थिती लक्षात घेता योग्य ती पाऊलं उचलत आहोत, असा दावा खान यांनी केला आहे.

आम्ही आमच्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंग, अलगीकरण आणि विलगीकरण यांचा सराव करत आपली आणि इतरांची सुरक्षा करणंही गरजेचं आहे, असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!