🕒 1 min read
कोल्हापूर:- भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार एकनाथ खडसे यांना ३० डिसेंबर रोजी चौकशीसाठी ईडी समोर हजर राहावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ईडीची नोटीस मिळाली असल्याचा खुलासा स्वतः एकनाथ खडसे यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. याच प्रकरणातून खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता ईडी मार्फत याच प्रकरणात खडसे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस म्हणजे खडसे यांना खूप मोठा धक्का आहे, हे मात्र निश्चित आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस बजावण्यात आल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एखादा राजकीय नेता जर भाजपच्या विरोधात गेला की त्यांच्यामागे ईडी लावण्याचं काम भाजप करत आहे. देश हिताच्या निर्णयापेक्षा सूड भावनेच्या प्रवृत्तीने राजकीय नेत्यांच्या मागे लागले जाते. मात्र खडसे यांना पाठवलेल्या नोटीसीची आम्हाला कुठलीही भीती वाटत नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- नाशिकमध्ये महाविकास आघाडीला सुरुंग; कॉंग्रेसनेही दिला स्वबळाचा नारा
- ग्रामपंचायतींवर भगवा फडकवण्यासाठी अब्दुल सत्तारांच्या गावागावात बैठका सुरु
- यूपीएचा भाग नसल्यामुळे शिवसेनेने युपीएच्या अध्यक्ष पदाबाबत भाष्य करणे योग्य नाही : कॉंग्रेस
- यूपीएच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेने सल्ला देऊ नये; अशोक चव्हाणांनी संजय राऊतांना फटकारले
- अखेर अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होणार, जानेवारीत आंदोलन करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
