Share

अश्लील ट्रोल प्रकरण : केतकी चितळे राज ठाकरेंच्या भेटीला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : गेले काही दिवस अभिनेत्री केतकी चितळेला सोशलमिडीयावर ट्रोल केले जात आहे. केवळ हिंदी भाषेत बोलण्यामुळे केतकीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. याबाबत केतकीने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. हिंदी भाषेत बोलल्याने सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आल्याच्या मुद्यावरून तिने मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले होते.

आता याच प्रकरणी केतकी चितळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता कृष्णकुंज निवासस्थानी राज ठाकरे यांना केतकी चितळे भेटून अश्लील ट्रोल प्रकरण सांगणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत. आता राज ठाकरे केतकी चितळेला काय आश्वासन देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दरम्यान, या प्रकरणी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, अभिनेते सुशांत शेलार, दिगंबर नाईक, प्रकाश वालावलकर यांनी मुख्यमंत्र्यांबरोबरच विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांना अटक करण्याची सूचना गुन्हे अन्वेषण शाखेतील अधिकाऱ्यांना केली असल्याची माहिती एका वाहिनीने दिली आहे. आयटी अॅक्टमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणी देखील केतकीने दिलेल्या निवेदनामध्ये करण्यात आली आहे.

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!