Share

विदर्भासाठी पुढाकार घेणा-यास मदत – राजू शेट्टी

Published On: 

नागपूर-  वेगळ्या विदर्भाच्या विषयाला मंगळवारी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुन्हा हात घातला. विदर्भाच्या मुद्यावर कुणी पुढाकार घेतल्यास त्याला नक्की मदत करू असे सांगत तिसरी आघाडी उघडण्याचे संकेत त्यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिले.

यावेळी शेट्टी म्हणाले की, गेली 15 वर्षे काँग्रेस- राष्ट्रवादीशी चुकीच्या धोरणांविरोधात लढा दिला. त्यांना खाली खेचण्यासाठी भाजपाची साथ दिली. मात्र, भाजपनेही अपेक्षाभंग केला. त्यामुळे तिस-या आघाडीसारखे एखादी महाआघाडी उदयास आली तर तिच्या सोबत जाण्याचा करू, स्व. गोपीनाथ मुंडे यांनी विविध पक्षांना सोबत घेऊन रिडालोसची मोट बांधली होती. त्यात आपला सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वाभीमानी पक्षाचे २०१० साली जयसिंगपूर येथे अधिवेशन झाले होते. त्यात छोटी राज्ये सोयीस्कर असल्याचा ठराव घेण्यात आला होता. छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड, गोवा यासारख्या छोट्या राज्यांनी लक्षणीय प्रगती केली आहे. तेलंगणाच्या आंदोलनालाही आपण पाठिंबा दिला होता, असे सांगत वेगळ्या विदर्भाच्या मागणीला व त्यासाठी होणा-या आंदोलनांना आपला पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने कापूस व धान उत्पादकांना जाहीर केलेली मदत फसवी आहे. एनडीआरएफ अंतर्गत नुकसान भरपाई देण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे का, हे राज्य सरकारने आधी सांगावे.

विमा कंपन्या न्यायालयात जातील. शिवाय अनेकांनी विमाच काढलेला नाही. त्यामुळे ती मदतही मिळणार नाही. बियाणे कंपन्याही तशी भूमिका घेतील. त्यामुळे प्रत्यक्षात शेतक-यांना कुठलीच मदत मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. बी.टी.चे वाण विकणा-या बियाणे कंपन्यांना संशोधनाच्या नावावर कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी घेतात. आता बी.टी. बियाण्यांवर बोंड अळी आल्यामुळे या कंपन्यांचे संशोधन फोल ठरले आहे. त्यामुळे आता शेतक-यांना झालेल्या नुकसानीची संपूर्ण जबाबदारी या कंपन्यांवर निश्चित करण्याची मागणी त्यांनी केली.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे शेतमालाला उत्पादनखर्चासह 50 टक्के नफ्याची हमी द्यावी, असा कायदा करण्यासाठी आपण लोकसभेत अशासकीय विधेयक मांडणार असल्याचे खा. शेट्टी यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!