मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलक आक्रमक झाले आहेत. दोन दिवसात निर्णय दिला नाही तर मंत्रालयाबाहेर आत्मदहन करू, असा इशारा या आंदोलकांनी दिला आहे. तर या आंदोलकांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरू असेही खा. संभाजी राजे यांनी यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर आज (ता. ३) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका मांडली. तसेच त्यांच्या अयोध्या दौरा, सामनाचे संपादकपद आणि मुस्लीम आरक्षण याविषयीही भाष्य केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ मराठा आरक्षणावर सरकार न्यायालयात ताकदीने लढत आहे. मुस्लिम आरक्षणावरुन आदळआपट करु नका, मुद्दा समोर आल्यावर भूमिका स्पष्ट करु, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सीएए आणि एनआरसीमुळे राज्यातील एकाही नागरिकाचं नागरिकत्व हिरावू देणार नाही, महाआघाडीच्या नेत्यांची समिती तयार करुन यावर भूमिका ठरवणार, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
तसेच, शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करणारच, एनपीएची अडचण नाही. सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जमुक्त करु. गेल्या दोन महिन्यात पहिली यादी जारी केली. दुसरी यादी पण जारी केली.शेतकरी कर्जमाफी योजना लवकरच पूर्ण करु, 10 लाख शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण झाले आहे, 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

