🕒 1 min read
भुसावळ : भुसावळ नगर परिषदेच्या वतीने आज विविध विकास कामांचे उद्घाटन पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, शहरातील रस्ते, महानगरपालिका शाळेची इमारत आदींच्या उद्घाटनाचा सोहळा आज पालकमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते कार्यकर्त्यांशी बोलत होते.
काही दिवसांपूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील बोदवड मध्ये एका सभेत बोलताना म्हणाले होते की, मी हेमामालिनीच्या गालासारखे रस्ते माझ्या गावात बनवले आहेत. त्यानंतर त्यांचावर या शब्दप्रयोगासाठी बऱ्याच ठिकाणी टीका झाली होती. परंतु आज त्यांनी हा शब्दप्रयोग खोडून काढला. ते म्हणाले की, मी ओम पुरीच्या गालासारखे रस्ते आता बनवत आहे. विविध ठिकाणच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली.
आजचा मतदार हा सुज्ञ आहे कोणाच मटण खातो आणि कोणाला मत देतो हे उमेदवाराला सुद्धा समजू देणार नाही , आजचा मतदार हा सुज्ञ झाला आहे मतदारांना कामाची गरज आहे अन्यथा तो राजकीय नेत्यांना घरी बसल्या शिवाय राहणार नाही. असे भाष्य यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सभेमध्ये बोलताना केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- केंद्र सरकारच्या PLI योजनेत TATA, Mahindra आणि Hyundai गाड्यांची निवड; Maruti यादीबाहेर
- योगी आदित्यनाथ यांचा राहुल गांधींवर घाणाघात, म्हणाले…
- अन् नारायण राणे संसदेत गोंधळले; सभापतींनी लक्षात आणून दिली चूक
- एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यापेक्षा चिघळवण्याचाच सरकारचा कट- गोपीचंद पडळकर
- IPL Auction 2022 : जानी दुश्मन सोबत ड्रेसिंग रूम शेअर करणार कृणाल पंड्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

