मुंबई : भारतीय निवडणूक आयोगाने देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यापासून देशात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यात विधानसभेसाठी निवडणूका होणार आहेत. तर या निवडणुकांचा निकाल १० मार्च रोजी लागणार आहे. पंजाब राज्य सोडले तर उर्वरित सर्वच राज्यात भारतीय जनता पक्ष एकतर थेट सत्तेवर आहे किंवा सत्तेत अप्रत्यक्षरीत्या सहभागी आहे. देशाचे लक्ष उत्तरप्रदेशकडे लागले असतानाच, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज उत्तराखंड निवडणूकीच्या प्रचारकरता उत्तराखंड राज्यात पोहचले आहेत.
आज प्रचार करताना योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी हिंदूत्ववाद आणि हिंदुत्व या दोन वेगळ्या गोष्टी असून आजकाल लोक त्याचा गैफायदा घेत आहेत अशी टीका राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षाला उद्देशून केली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना योगी आदित्यनाथ यांनी उत्तराखंडमधल्या प्रचारसभेत बोलताना काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले कि, ” सध्या हिंदूंना किती प्रमाणात अपमानित करता येईल याची जणू स्पर्धाच चालू आहे. ज्यांना आपण जन्माने हिंदू आहोत का नाही हे पण माहिती नाही ते पण आजकाल हिंदू धर्म म्हणजे काय किंवा हिंदू संस्कृती म्हणजे काय हे सांगत आहेत. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी स्वामी विवेकानंद यांनी हिंदू म्हणजे याच्या केलेलया व्याख्याचा पण उल्लेख केला. ”हिंदू” हा शब्द म्हणजे कोणताही धर्म नसून ती एक जीवन जगायची संस्कृती आहे आणि आपण जगात कुठेही गेलो तरी जगातील लोक आपल्याला हिंदू म्हणूनच ओळखतात.
काही महिन्यांपूर्वी बोलताना राहुल गांधी म्हणाले होते कि, ” हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद्यांमध्ये” फरक आहे; जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो, निडर असतो तो हिंदू असतो आणि महात्मा गांधी हे हिंदु होते, हिंदुत्व पाळणारे होते. तर दुसरीकडे त्यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा हिंदुत्ववादी होता, तो सत्य मार्गावर चालणाऱ्या गांधीजींना घाबरत होता ,तो एक डरपोक होता अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधी यांच्यावर आज निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या :
- अन् नारायण राणे संसदेत गोंधळले; सभापतींनी लक्षात आणून दिली चूक
- एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यापेक्षा चिघळवण्याचाच सरकारचा कट- गोपीचंद पडळकर
- IPL Auction 2022 : जानी दुश्मन सोबत ड्रेसिंग रूम शेअर करणार कृणाल पंड्या
- अरविंद केजरीवाल आजपासून पंजाब दौऱ्यावर
- “महाविकास आघाडीच्या अहंकाराचे वस्त्रहरण”, आशिष शेलारांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

