औरंगाबाद : औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नव्या व जुन्या जायकवाडी येथील पंपगृहात (१०० दलली व ५६ दलली योजना) रविवारी (दि.१८) विद्युत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर ची केबल जाॅईन्टीग कीट तसेच ११ केव्ही डिस्कमध्ये बिघाड झाल्यामुळे दोन तास पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे शहरावर पुन्हा एकदा जलसंकट आले आहे. पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल पालिकेने दिलगिरी व्यक्त केली असून नागरीकांच्या सहकार्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाद्वारे करण्यात आले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या अतिशय जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे मुख्य जलवाहिन्यांना सुस्थितीत ठेवून शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला चोवीस तास कसरत करावी लागते. गेल्या महिन्या दोन महिन्यात दोन ते तीन वेळा पाईपलाईन फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा अनेकदा विस्कळीत झाला होता. सध्या शहराला पाणीपुरवठा करणार्या नवीन व जुनी जायकवाडी उदभव पंपगृह १०० दलली योजना अनेक तास बंद होती.
त्याच दिवशी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या जुन्या जायकवाडीच्या विद्युत उपकेंद्रासमोरील पोल स्ट्रक्चरवरील ११ केव्ही डीस्क इंन्सुलेटर जळाल्यामुळे नवीन व जुनी जायकवाडी दोन्ही योजनेवरील पंपींग रात्री बारा पर्यंत बंद होते. सोमवारी नवीन फारोळा पंपगृह (१००दलली योजना)येथे एल.टी.पॅनलमध्ये बिघाड झाल्यामुळे सकाळी ६ ते दुपार पर्यंत तेथील संपूर्ण पंपींग बंद होते.
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत नवीन फारोळा व जायकवाडी उदभव पंपगृह व विद्युत उपकेंद्रात अचानक उद्भवलेली दुरुस्ती कामे युद्धपातळीवर हाती घेऊन पूर्ण करण्यात आली. जायकवाडी उद्भव तसेच नवीन फारोळा पंपगृह येथील पंपिंग उक्त संबोधल्या प्रमाणे बंद झाल्याने शहरातील वितरण विस्कळीत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी होणाऱ्या गैरसोय बाबत दिलगिरी व्यक्त करण्यात येत असून अचानक उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘फोन हॅक करुन पाळत का ठेवली? ; मोदी सरकारने याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे’
- मराठी पाऊल पडते पुढे! मराठी चित्रपट आता आंतरराष्ट्रीय महोत्सवात झळकणार
- छत्री, मोदी आणि कॉंग्रेस! सोशल मीडियावर मोदींचा स्वावलंबीपणा व्हायरल
- ‘पेगासस’ प्रकरणावर मोदी, शाहांनी स्पष्टीकरण द्यावे; संजय राऊतांची मागणी
- ‘उठा उठा आषाढी आली, ‘स्वबळावर’ गाडी चालवत पंढरीला जायची वेळ आली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
