टीम महाराष्ट्र देशा: सोशल मीडियावर दररोज आपल्याला आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ बघायला मिळतात. या व्हिडिओमध्ये कधी जंगली प्राण्यांच्या तर कधी पाळीव प्राण्यांच्या व्हिडिओंचा समावेश असतो. यामध्ये कधी क्युट व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात तर कधी व्हिडिओ बघून आपला आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आपल्या परिसरात एखादा कुत्रा असेल तर त्या कुत्र्याला त्या परिसराचा सिंह म्हणजेच राजा असे म्हटले जाते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला या राजासारखे कुत्र्याचा चित्तथरारकपणा बघायला मिळेल. कारण या व्हिडिओमध्ये एक कुत्रा चक्क वाघाचे कान ओढताना दिसत आहे. आणि या व्हिडिओमधील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे शेजारी बसलेला सिंह फक्त कुत्रा आणि वाघ यांची गंमत बघत बसला आहे.
आश्चर्यचकित करणारा हा व्हिडिओ
सध्या इंस्टाग्राम वर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तीन प्राणी आपल्याला एकत्र दिसत आहे. जे वास्तविक पाहता कधीही एकत्र दिसत नाही. या व्हिडिओमध्ये चक्क कुत्रा, वाघ आणि सिंह एकत्र दिसत आहे. हे तीन प्राणी फक्त ॲनिमेटेड चित्रपटांमध्ये एकत्र दिसू शकतात. पण या व्हिडिओमध्ये तिन्ही प्राणी एकत्र दिसत आहे. व्हिडिओमध्ये कुत्रा वाघाचे कान ओढताना दिसत आहे.
पाहा व्हिडिओ
Viral Video | कुत्र्याने केले वाघाला बेहाल, पाहा व्हिडिओ! pic.twitter.com/6SBjePUru4
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) October 9, 2022
कुत्रा आणि वाघ यांची जुगलबंदी
इंस्टाग्रामवर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये वाघ आणि कुत्रा यांची जुगलबंदी सुरू आहे. या व्हिडिओमध्ये कुत्रा जोरजोरात वाघाचे कान ओढताना दिसत आहे. त्याचबरोबर वाघ आणि कुत्र्याची ही जुगलबंदी सुरू असताना शेजारी एक सिंह शांततेत बसलेला या व्हिडिओत दिसत आहे. हा शेजारी शांततेत बसलेला सिंह सर्वांना आश्चर्यचकित करत आहे. कारण सिंह काहीही न करता कुत्रा आणि वाघ या दोघांच्या भांडणाचा तमाशा बघत बसलेला आहे.
व्हायरल व्हिडिओ
इंस्टाग्राम वर animal_powers या पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ पाहून वापरकर्त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत 449k व्ह्यूज मिळालेले असून हा व्हिडिओ 19k लाईक्ससह व्हायरल झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Farming Update | मसूर मिश्र लागवडीवर शेतकऱ्यांना मिळू शकते भरघोस उत्पन्न
- Shivsena | ठाकरे अन् शिंदे गट यांचा अॅक्शन मोड! दुपारच्या बैठकीनंतर नंतर टाकणार डाव?
- Video : काल शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवला; आज शरद पवारांचा दानवेंसोबत एकाच कारमधून प्रवास
- Whatapp Update | Whatapp घेऊन येत आहे ‘हे’ नवीन इंटरेस्टिंग फीचर
- Ravi Rana | “शिंदे साहेब गरज पडल्यास…”, एकनाथ शिंदेंना आमदार रवी राणांची ऑफर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

