🕒 1 min read
नवी दिल्ली : जेव्हा विराट कोहलीने (Virat Kohli) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी (IND vs SA) सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनचा खुलासा केला तेव्हा त्यात अजिंक्य रहाणेचे (Ajinkya Rahane) नाव पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. रहाणेऐवजी फॉर्मात असलेल्या हनुमा विहारी (Hanuma Vihari) किंवा श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) संधी दिली जाईल, अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही. यावर अनेक दिग्गजांनी प्रश्न उपस्थित केले पण भारताचा माजी खेळाडू वसीम जाफरने रहाणेच्या निवडीचा निर्णय योग्य असल्याचे म्हंटले आहे.
अजिंक्य रहाणेचा अलीकडचा फॉर्म चांगला नाही. तर श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी मालिकेत सर्वांना प्रभावित केले. याशिवाय हनुमा विहारीनेही दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध चांगली फलंदाजी करताना फॉर्ममध्ये राहण्याची चिन्हे दाखवली. मात्र, राहुल द्रविड आणि संघ व्यवस्थापनाने रहाणेला अधिक संधी देणे आणि दक्षिण आफ्रिकेतील कठीण परिस्थितीत त्याचा अनुभव पाहता त्याला निवडले.
जाफरने एका वृत्तसंस्थेसी बोलताना सांगितले की, रहाणेला खेळवण्याचा निर्णय संघाची सकारात्मक मानसिकता आणि विजयी मानसिकता दर्शवतो. तो पुढे म्हणाला, व्यवस्थापनाने अजिंक्य रहाणेला निवडण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. होय, श्रेयस अय्यरसाठी हे थोडे कठीण होते परंतु मला वाटते की तो प्रतीक्षा करू शकतो. हे योग्य संयोजन आहे आणि पहिल्या सामन्यात जाण्यापूर्वी त्याची मानसिकता सकारात्मक होती हे यावरून दिसून येते. त्याची जिंकण्याची मानसिकता होती.
दक्षिण आफ्रिकेतील चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या अनुभवी खेळाडूंवर अवलंबून राहणे महत्त्वाचे आहे, असेही जाफर म्हणाला. या दौऱ्यांवरील दोघांच्या अपयशावर जाफरने कठोर निर्णय घेण्याचे आवाहन केले. तो म्हणाला, ‘या मालिकेनंतर तुम्ही पुजारा आणि रहाणेबाबत निर्णय घेऊ शकता. होय सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी आणि सर्वजण वाट पाहत आहेत आणि कदाचित कार्य करू शकतील. पण ज्यांना अनुभव आहे, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. या मालिकेत काही चूक झाली तर तुम्ही गंभीर निर्णय घेऊ शकता.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांना मारून बाहेर काढण्याचे बळ या देणग्यांतून देशाला मिळणार असेल तर…’
- भाजप हा देशातील नव्हे तर कदाचित जगातलाही सगळ्यात श्रीमंत पक्ष- संजय राऊत
- ‘विरोधकांच्या हातातील ‘पुंजी’ कुजवून अडचणी याव्यात हाच भाजपचा उदात्त हेतू’
- ‘जनतेकडून पक्षाच्या तिजोरीत पैसे गोळा करून देश बलाढ्य करण्याचे हे कोणते सूत्र?’
- …तर राज्यात लॉकडाऊन लावण्यात येईल- भारती पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

