वाशीम: देशात आणि राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच एक दिलासादायक बातमी आली आहे. महाराष्ट्र राज्यातील हा जिल्हा आता कोरोन मुक्त झाला आहे.
वाशीम जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून एका कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरु होते. या कोरोना बाधित रुग्णाचे २० व २१ दिवसानंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे.
दरम्यान या रुग्णावर उपचार सुरु असतांना रुग्णाची परिस्तितीत झालेला सुधार बघून उपचाराचा काही परिणाम झाला का नाही यासाठी या रुग्णाच्या लाळेचे नमुने पुन्हा चाचणी करण्यास पाठवण्यात आले होते. काल (शुक्रवारी) या व्यक्तीचे दोन्हीही अहवाल नेगेटिव्ह आल्या नंतर हि व्यक्ती पूर्णपणे या आजारातून मुक्त झाल्याची खात्री करून घेत या रुग्णाला आज (शनिवारी) डिस्चार्ज देण्यात आला.
यावेळी जिल्ह्यात कोरोनाशी लढा देणाऱ्या संपूर्ण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवून या रुग्णाला डिस्चार्ज दिला. हि माहिती जिल्ह्यात पोहोचल्या नंतर सर्वांना दिलासा मिळाला.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

