मुंबई : राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने एकीकडे विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यावर युजीसी काय नेमका निर्णय देते याकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं. यूजीसीच्या (विद्यापीठ अनुदान आयोग) परीक्षा व शैक्षणिक कॅलेंडरच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार देशातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महास्वयम पोर्टल असताना महाजॉब नावाचं पोर्टल कोट्यावधी रुपये खर्च करून का बनवलं ?
MHA, in a letter to Union Higher Education Secy, today permitted conduct of exams by universities&institutions. The final Term Exams are to be compulsorily conducted as per UGC Guidelines and as per the Standard Operating Procedure approved by Union Ministry of Health: MHA pic.twitter.com/mTHWTy0GZ3
— ANI (@ANI) July 6, 2020
राज्य सरकारने करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, युजीसीने सेमीस्टर आणि अंतिम परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. यासंदर्भात यूजीसीने एक नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, सप्टेंबर महिन्यापूर्वी परीक्षा घेण्याची सूचना करण्यात आली आहे. तर राज्यात लॉकडाउनमुळे ऑफलाइन आणि ऑनलाइन पदव्युत्तर परीक्षा होणार आहे. युजीसीने नियमावली जाहीर केल्यामुळे देशभरातील विद्यापीठांना परीक्षा घेणे आता बंधनकारक असणार आहे.
परीक्षांबाबत यूजीसीने घेतलेल्या निर्णयाला युवसेनेचा विरोध, सरदेसाईंनी विचारला ‘हा’ मार्मिक सवाल
दरम्यान, राज्य सरकारने व्यवसायिक आणि गैर-व्यवसायिक कोर्स करणाऱ्या अंतिम वर्षातील शेवटची सेमिस्टर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली होती. मात्र, यूजीसीच्या निर्णयानंतर राज्य सरकार आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य सरकार एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना नापास करणार होते? ते सुदैवाने आता बचावले.
आधी घोषणा, मग निर्णय, मग गृहपाठ यामुळे जो विद्यार्थ्यांना गेले तीन महिने मनस्ताप झाला. विद्यार्थी भयभीत आहेत त्यांना संभ्रमातून बाहेर काढा…आता तरी सु-सूत्रे योग्य नियोजन करा!!
(3/3)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 7, 2020
तर दुसरीकडे यूजीसीने घेतलेल्या निर्णयासंदर्भातील आपल्या शेवटच्या ट्वीटमध्ये भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ‘राज्य सरकार एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना नापास करणार होते? ते सुदैवाने आता बचावले. आधी घोषणा, मग निर्णय, मग गृहपाठ यामुळे जो विद्यार्थ्यांना गेले तीन महिने मनस्ताप झाला. विद्यार्थी भयभीत आहेत त्यांना संभ्रमातून बाहेर काढा… आता तरी सु-सूत्रे योग्य नियोजन करा!!’ असं म्हणत सल्लाही ठाकरे सरकारला आशिष शेलार यांनी दिला आहे.
Shocked and appalled by the decision of Central Govt to ‘compulsorily’ conduct Final year exams!!
This at a time when India has reported 7Lakh cases and is the third worst affected country in the world!
Do they not care about #StudentLives at all??? pic.twitter.com/ysGp763usA— Varun Sardesai (@SardesaiVarun) July 6, 2020
दरम्यान, आता युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी ट्वीट करत यूजीसीने घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. ‘देश जगभरातील सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना विद्यार्थांच्या जीवाची अजिबात काळजी नाही का?’, असा प्रश्न वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

