पुणे : कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आलेला आहे यामुळे देशातील प्रत्येक नागरिकांची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे यातच अनेक विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना उर्वरित फी भरण्याचा तगादा लावलेला आहे तसेच विद्यापीठाच्या परीक्षा फॉर्म भरण्याचे व परीक्षा शुल्क भरण्याचा देखील तगादा लावलेला आहे.
याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज केलेली आहे.
महाराष्ट्रात अनेक महाविद्यालायकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावला जात आहे अशा कठीण प्रसंगी विद्यार्थ्यांवर शैक्षणिक शुल्काची दबाव टाकणाऱ्या संस्थाचालकांवर कडक कारवाई करावी व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा तसेच उच्च शिक्षण,वैद्यकीय , कृषी , व्यवसायिक , तंत्रशिक्षण तसेच सर्व प्रकारचे शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क तात्काळ माफ करुन विनाशुल्क विद्यार्थ्याचें परीक्षा फॉर्म भरुन घ्यावेत व तात्काळ विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा अशा प्रकारची मागणी अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री स्वप्निल बेगडे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

