Share

विराट कोहलीचं टशन ; वाद घालण्यासाठी जोस बटलरच्या दिशेनं सुसाट : पहा व्हिडिओ

Published On: 

अहमदाबाद : पाच टी20 सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-2 अशी बरोबरी असताना अखेर भारतीय संघाने पाचव्या आणि निर्णायक क्रिकेट सामन्यात बाजी मारली आहे. दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर संघाला हे यश संपादन करण्यात आलं. इंग्लंड संघापुढं रोहित शर्माच्या वादळी ३४ चेंडू मधील ६४ धावांच्या जोरावर भारताने २० षटकांमध्ये २२५ धावांचं आव्हान ठेवले होते. हा धावांचा डोंगर उभा करण्यासाठी कर्णधार विराट कोहली याने ५२ चेंडूत नाबाद ८० धावांची आक्रमक खेळी केली. तर सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी अनुक्रमे १७-१७ चेंडूंत ३२ आणि ३९ धावा चोपल्या. यासह भारताने ही 5 सामन्यांची मालिका 3-2 ने जिंकली.

मात्र, या आव्हानाचा सामना करताना इंग्लंडची टीम अवघ्या 188 धावात ढेपाळली. असं असलं तरी विराट कोहली आणि जोस बटलर यांच्यात उडालेल्या शाब्दिक चकमकीमुळेही हा सामना बराच गाजला. क्रिकेटच्या मैदानात खेळाडूंमध्ये होणारे वाद आणि झगडे हे तसे नवीन नाहीत. परंतु, विराट कोहली आणि बटलर दरम्यान काल झालेला झगडा हा तसा मोठाच होता. दोघांमध्येही उघडपणे शाब्दिक चकमक उडाली होती. एवढेच नव्हे तर या दोघांनी एकमेकांना ठसन देत एकमेकांकडे कूचही केली. त्यामुळे या दोघांमध्ये किती टोकाचं वाजलं असेल याचा अंदाज येतो.

इंग्लंडचा डाव सुरू असताना 13 व्या षटकावेळी हा वाद झाला. 225 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला दुसरा धक्का बसला. भुवनेश्वर कुमारने जोस बटलरला बाद केलं. त्यावेळी इंग्लंडची धावसंख्या 130 होती. बाद झाल्यानंतर बटलर परत जात होता, तेव्हा त्याने विराटकडे पाहून काही तरी कमेंट केली. बस्स झालं. बटलरच्या या कमेंटवर विराटचा पारा चढला. त्यामुळे विराट तावातावाने बटलरच्या दिशेने जायला निघाला. डोकं गरम झालेल्या विराटनेही मग त्याच्यावर लाखोली वाहण्यास सुरुवात केली. त्यामुळे बटलरही भडकला आणि दोघेही एकमेकांच्या दिशेने यायला लागले.

https://twitter.com/MrPrabhmanSingh/status/1373318687818534915?s=20

विराट आपल्या दिशेने येत असल्याचं पाहून इंग्लंडच्या बटलरने डगआऊटकडे जाणं थांबवलं. त्याऐवजी तो मैदानाच्या दिशेने येऊ लागला. त्यावेळी बटलर आणि विराट दोघेही एकमेकांना पाहून काहीतरी बडबडत होते. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र, हे दोघे कोणत्या कारणामुळे एकमेकांवर आगपाखड करत होते आणि काय बोलत होते हे कळू शकले नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!