🕒 1 min read
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली केवळ भारतात नव्हे तर जागतिक क्रिकेट मध्येही तितकाच प्रसिद्ध आहे. त्याचे चाहते जगभरात आहेत. विराटची हीच क्रेझ आता शेजारी मध्येही दिसून आली आहे. विराटाचे ७१वे शतक अजूनही प्रतीक्षेत आहे. पाकिस्तान लीगमध्ये मैदानावर उपस्थित असलेल्या एका चाहत्यांने तिथून विराटला पोस्टर द्वारे शतक करण्याचे आवाहन केले आहे.
पाकिस्तानातील विराटच्या या चाहत्यांने त्याचे पोस्टर बनवून पीएसएलच्या एका सामन्यात नेला. ज्यावर त्यांनी लिहले होते “मला पाकिस्तानातं तुला शतक करताना पहायचे आहे ,” जवळपास १४ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळूनही कोहली पाकिस्तानमध्ये अजूनपर्यंत खेळला नाही. याचा अर्थ असाही आहे की त्याने पाकिस्तान संघाविरुद्ध कधीही कसोटी सामना खेळला नाही. मात्र कोहलीचा पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय आणि टी२० मध्ये चांगला रेकॉर्ड आहे.
Virat Kohli's poster in PSL in Pakistan and the fan wrote that "I want to see your century in Pakistan." – Virat Kohli's fan following is just Unmatchable. pic.twitter.com/b2sHIb5HBb
— Tanuj Singh (@ImTanujSingh) February 18, 2022
विराटने पाकिस्तानविरुद्ध १३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५३६ धावा केल्या आहेत आणि सात टी२० मध्ये ३११ धावा केल्या आहेत कोहलीने जानेवारीमध्ये कसोटी कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा केल्यानंतर अनेक माजी आणि सध्याच्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
- IND vs WI: वेस्ट इंडिज विरुध्द दुसरा टी २० सामना जिंकत भारतीय संघाने रचले किर्तीमान
- पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्या विरोधात बिहारमध्ये गुन्हा दाखल
- हिजाब प्रकरणावरुन कर्नाटक सरकारचे कर्नाटक उच्च न्यालयालयात महत्वाचे मत
- Shiv Jayanti 2022 : ना स्वागत, ना भाषण…फक्त शिवजागर
- “दोन किमीचा रस्ता करता करता…”, नितीन गडकरींनी सांगितला ‘तो’ किस्सा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
