टीम महाराष्ट्र देशा: सोशल मीडियावर अनेकदा आपल्याला प्राण्यांचे व्हिडिओ बघायला मिळतात. बराच वेळा त्या व्हिडिओमध्ये चाललेली प्राण्यांची मस्ती पाहून आपल्याला हसू आवरत नाही. तर काही वेळा हे व्हायरल व्हिडिओ बघून आपल्याला आश्चर्याचा धक्का लागतो. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये अनेकदा हत्तींच्या व्हिडिओचा समावेश असतो. बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्याला हत्तीचे भयानक रूप पाहायला मिळतो. पण सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला हत्तीची क्युटनेस दिसत आहे. या व्हिडिओमध्ये हत्ती आपल्या मालकाला त्याच्यासोबत खेळण्यासाठी आग्रह करताना दिसत आहे.
हत्ती करतोय खेळण्याचा आग्रह
सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक हत्ती एका माणसासोबत खेळण्यासाठी हट्ट करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती त्याचे पेंटिंगचे काम करताना दिसत आहे. तर त्याचवेळी हत्ती त्या व्यक्तीला खेळण्यासाठी आग्रह करत आहे. ती व्यक्ती त्याच्या कामात मग्न असताना हत्ती मागून त्याच्या पाठीवर आपली सोंड ठेवून त्या माणसाला खेळण्यासाठी बोलवताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाठीवर सोंड ठेवून ती व्यक्ती हत्तीला प्रतिसाद देत नव्हती म्हणून हत्ती आपले दोन्ही पाय समोर असलेल्या लाकडाच्या भिंतीवर पाय ठेवून त्या व्यक्ती सोबत मस्ती करायला लागतो. त्या व्यक्तीला आपल्या कामातून दुर्लक्षित करून हत्ती त्याला आपल्या सोबत खेळण्याचा आग्रह करतो.
पाहा व्हिडिओ
हाथी का ऐसा प्यार देखा है
साथ में खेलने के लिए हाथी मालिक को मना रहा है
???????? pic.twitter.com/zkVWkiNxh5— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) October 5, 2022
व्हायरल व्हिडिओ
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर ‘जिंदगी गुलजार हैं!’ नावाच्या अकाउंट वर शेअर करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडिओला 8 हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ 300 पेक्षा अधिक लोकांनी शेअर केला आहे. या व्हिडिओला 4.5k पेक्षा अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंकडून 3 चिन्हं अन् 3 नावं जाहीर; ‘ही’ आहेत चिन्ह आणि नावं
- Ambadas Danve | “खोकेवाल्यांच्या सेनेने शिंदेच्या नावावर सामोरं यावं, मग….”; अंबादास दानवेंचं शिंदे गटाला चॅलेंज
- Tripling Season 3 | TVF च्या Tripling सिजन 3 चा ट्रेलर रिलीज
- Vijay Shivtare | “शरद पवारांना २०१४ पासून शिवसेना संपवायची होती…”, विजय शिवतारेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग
- Apple iPhone 14 Plus | Apple iPhone 14 Plus वर सुरू आहेत बंपर एक्सचेंज ऑफर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

