Share

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सेव्हन स्टार हॉस्पीटल व्यवस्थापनाच्या अडचणी वाढल्या

Published On: 

नागपूर  : कोव्हिड काळात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये प्राप्त अधिकाराच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून नंदनवन पोलिसांनी जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पीटल व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मनपा प्रशासनाने गुरुवारी (ता. २०) दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे भादंविच्या कलम १८८, २९० सह कलम आपत्ती व्यवस्थापन कायदा अधिनियम २००५ कलम ५१, ५८, सहकलम साथीचे रोग अधिनियम १८९७ कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

कोव्हिड अथवा नॉन कोव्हिड रुग्णांकडून शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार रुग्णांकडून रक्कम आकारावी लागते. यासंदर्भात शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. असे असताना सेव्हन स्टार रुग्णालयाने नॉन कोव्हिड रुग्णांकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत ६,८६,५२७ रुपये अधिकचे आकारले. शासनाच्या नियमांचे पालन खासगी रुग्णालये योग्य प्रकारे करतात की नाही यासाठी नागपूर महानगरपालिकेने अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्या नेतृत्वात एक पथक तयार केले आहे. हे पथक कुठल्याही रुग्णालयास आकस्मिक भेट देऊन त्याची पाहणी व तपासणी करतात.

सेव्हन स्टार रुग्णालयात या पथकाला अनियमितता आढळली. शिवाय कागदपत्रांची पाहणी केली असता नॉन कोव्हिड रुग्णांकडून अधिकची रक्कम घेतल्याचे निष्पन्न झाले. या आधारे संबंधित रुग्णालयाला मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नोटीशीद्वारे जाब विचारला होता. मात्र, त्याचेही समाधानकारक उत्तर सेव्हन स्टार हॉस्पीटल व्यवस्थापनाकडून न मिळाल्याने आयुक्तांनी १८ ऑगस्ट रोजी एक आदेश काढला. रुग्णांकडून अतिरिक्त स्वरूपात आकारलेले ६,८६,५२७ रुपये तात्काळ परत देण्याचे आदेश याद्वारे सेव्हन स्टार हॉस्पीटलला देण्यात आले होते.

आदेशाची तात्काळ अंमलबजावणी न केल्यामुळे आज (ता. २०) मनपा प्रशासनाने साथरोग प्रतिबंधक आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत सेव्हन स्टार हॉस्पीटलविरुद्ध नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे नंदनवन पोलिसांनी अखेर सेव्हन स्टार हॉस्पीटल व्यवस्थापन व इतर सर्व संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

महत्वाच्या बातम्या- 

‘ती’ नावे लवकरच जाहीर करतो, निलेश राणेंचा खळबळजनक दावा

धोनीच्या निवृत्तीच्या निर्णयानं हर्ट झालीय ‘ही’ अभिनेत्री 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!