Share

दादा कधी रागवतो तर, कधी हुंदका काढतो, विनोद तावडेंचा अजित दादांना टोला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : दादा कधी रागवतो तर, कधी हुंदका काढतो आणि हे सगळं नाटक असत” अशा शब्दात तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडेंनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना तावडे यांनी ही टोलेबाजी केली आहे. अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर जे घडलं आणि अजित पवारांचे पत्रकार परिषदेत डोळे पानावले हे संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले. यावरून विनोद तावडे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

”मी नव मतदार, विकासाचा भागीदार” या शिर्षकांतर्गत “कॉफी विथ युथ” म्हणून ठाण्यात एका कार्यक्रमा दरम्यान मंत्री विनोद तावडे यांनी नव तरुण मतदारांशी संवाद साधला. नव मतदारांचे अधिकार, त्यांचे हक्क, त्यांचे कर्तव्य आणि सरकारने नव मतदारांकरिता काय केले या सर्वची माहिती देत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही टोलेबाजी केली.

दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  मुंबई येथे पत्रकार परिषद घेत राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण दिले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना माझ्यामुळे त्रास सहन करावा लागला. हे मला पटले नाही. त्यामुळे कुठे तरी वाईट वाटले देशातील मोठ्या नेत्याचे नाव विनाकारण ईडीच्या फाईलमध्ये आले यामुळे या साऱ्या प्रकाराला कंटाळून नैतिक जबाबदारी म्हणून विवेकबुद्धीला स्मरून राजीनामा दिला होता. या राजीनाम्याचे स्पष्टीकरण करताना अजित पवारांना पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!