Share

राज ठाकरेंची स्टँडअप कॉमेडी निवडणुकांनंतरही अशीच चालू राहावी : विनोद तावडे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधी प्रचाराचा धडाका लावला आहे तर दुसरीकडे भाजप नेते हे राज ठाकरे यांच्या या भूमिकेची टिंगल उडवताना दिसत आहेत. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पुन्हा एकदा राज यांना लक्ष करत खिल्ली उडवली आहे. राज ठाकरेंची स्टँडअप कॉमेडी निवडणुकांनंतरही अशीच चालू राहावी, असे म्हणत तावडे यांनी टोला लगावला आहे.

तावडे म्हणाले की, राज ठाकरेंची ही स्टँडअप कॉमेडी, टुरिंग टॉकीज राज्यातील मतदानानंतरही असंच सुरू राहू द्या, त्यामुळे 23 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक होईल. यावेळी तावडे यांनी राज यांच्या मुंबईतील काळाचौकी येथे झालेल्या सभेबाबत देखील भाष्य केले. तावडे म्हणाले की, राज ठाकरेंनी सभेत बोलवलेल्या कुटुंबाचा सरकारशी काहीही संबंध नाही. कुणीतरी मोदीप्रेमाने हे पेज सुरू केलं असून त्याचा सरकारशी आणि भाजपाशी संबंध नाही. तसेच या फोटोवर हे लाभार्थी असे कुठेही लिहिलं नाही. कुणतरी तो फोटो काढून मोदी हे तो मुमकीन है.. असे लिहित त्या कुटुंबाचा फोटो जोडला. अर्थात, त्या कुटुंबाच्या परवानगीशिवाय तो फोटो प्रसिद्ध करणे चुकीचे असल्याचेही तावडेंनी म्हटले.

दरम्यान मुंबईतील काळाचौकी येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी एका कुटुंबाला मंचावर बोलावून या कुटुंबाचा फोटो आम्ही लाभार्थी म्हणून भाजप आज प्रदर्शित करत आहे असा आरोप केला होता. याबाबतची सत्यता तावडे यांनी यावेळी स्पष्ट केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!