टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे पक्षानी प्रत्यक्ष सहभाग घेतला नसला तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजप विरोधात प्रचार करत आहेत. तर मनसे कार्यकर्ते देखील भाजप नेत्यांच्या हात धुवून मागे लागल्याचे दिसत आहे. एका मनसे कार्यकर्त्यानी केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांना पत्र लिहून शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची खिल्ली उडवली होती. त्यावर आता विनोद तावडे यांनी मनसेच्या पत्राचा समाचार घेतला तर मनसे हा भाड्यानं विकलेला पक्ष आहे अशी टीका केली.
विनोद तावडे म्हणाले की, , ‘ती पाच वर्षांपूर्वीची घटना आहे, त्याचा आताच्या निवडणुकांशी काहीही संबंध नाही. त्यानंतर, राजनाथसिंह यांच्यासोबत मी अनेक दौरे केले. गाडीतून केले, विमानातून केले, ट्रेनमधून गेले. पण मनसे, जे भाड्यावर विकले जातात, त्यांना या गोष्टी माहित नसतात. असे तावडे म्हणाले. तर दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी इचलकरंजी येथील सभेत बोलताना, तावडेंना विनोदी नेता असे संबोधले होते. तसेच, राजनाथसिंहांचा ड्रायव्हर ज्यांना आपल्या गाडीत बसू देत नाही, त्यांनी राज ठाकरेंबद्दल बोलू नये, असा टोला तावडे यांना लगावला होता.
तर दुसरीकडे नवी मुंबईतील मनसे शहर अध्यक्षांनी गृहमंत्री राजनाथसिंह यांना पत्र लिहून विनोद तावडेंना तुमच्या गाडीत बसू देण्याची एकदा संधी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे विनोद तावडे यांची खिल्ली उडवणारे हे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

