Share

स्वत:च्या बुडाखाली काय जळतंय ते आधी पहा; राऊतांचे दरेकरांना सडेतोड उत्तर

Published On: 

नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवारांसाठी खुर्ची उलचलून आणतानाची फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. फोटोचे स्पष्टीकरण देत असताना संजय राऊत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. संजय राऊत भाजपच्या कार्यकर्त्यांना चुXXगिरी बंद करा, असे म्हणाले होते. त्यावरुन भाजपही आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीमध्ये भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दीप्ती रावत यांनी तक्रार दाखल केली आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी राऊतांवर टीका केली आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी संजय राऊतांची पाठराखण करत प्रविण दरेकरांवर निशाणा साधला आहे.

प्रविण दरेकरांना सध्या कोणता धंदाच नाही. रोज उठायचं आणि महाविकास आघाडीविरोधात बकवास वक्तव्ये करायची हाच एकमेव धंदा आहे. स्वत:च्या बुडाखाली काय जळतंय ते आधी पहा. संजय राऊतांविषयी बोलण्याची तुमची कुवत आहे का हे आधी तपासून घ्या, असे विनायक राऊत प्रविण दरेकरांना म्हणाले आहेत.

दरम्यान, संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यामध्ये काही आक्षेपार्ह आहे असे आम्हाला मूळीच वाटत नाही. संजय राऊतांना कुठेतरी गोवायचं म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, असा गंभीर आरोपही यावेळी विनायक राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांविरोधात तक्रार केली त्याला सामोरे जायला सक्षम आहेत. पण संपूर्ण शिवसेनाही संजय राऊतांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असेही विनायक राऊत म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!