Share

‘त्या’ पदावरून अशोक चव्हाण यांना हटवून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करा : विनायक मेटे

Published On: 

पुणे – मराठा आरक्षणाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांना हटवण्याची मागणी शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर समस्यांबाबत सरकार झोपेचं सोंग करतंय, असा गंभीर आरोप देखील मेटे यांनी केला आहे.

विनायक मेटे म्हणाले, “मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर समस्यांबाबत सरकार झोपेचं सोंग करतंय. त्यामुळं सरकारला जागं करावं लागणार आहे. त्यासाठी आंदोलन करावंच लागणार आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण विषयक उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून अशोक चव्हाण यांना हटवावे.”

विनायक मेटे यांच्या नेतृत्वात राज्यभरातल्या ९ मराठा संघटना एकत्र येऊन मराठा समन्वय समिती गठीत झाली आहे. मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांना हटवून एकनाथ शिंदे किंवा दुसऱ्या सक्षम मंत्र्याकडे उपसमितीचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी विनायक मेटेंनी केली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण मुद्द्यावरुन ९ ऑगस्ट म्हणजेच उद्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही मेटेंनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याला विरोध करणार असल्याचं मेटे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

‘नागरिकांच्या सहकार्याशिवाय ‘कोरोना’ संसर्गावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही’

‘सरकारच्या ऑनलाईन शिक्षणात गरीब, आदिवासी विद्यार्थ्यांचा विचारच नाही’

मध्यरात्री गावातील वीज पुरवठा बंद करुन बेळगावात शिवरायांचा पुतळा पुतळा हटवला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!