Share

‘सरकारच्या ऑनलाईन शिक्षणात गरीब, आदिवासी विद्यार्थ्यांचा विचारच नाही’

Published On: 

पुणे- सरकार जे ऑनलाइन शिक्षण देत आहे त्यात फक्त युट्यूब चॅनेल, मोबाईल अँप्लिकेशन, शैक्षणिक व्हिडीओ, पीडीएफ तयार करणे व्हाट्सपवर डाउनलोड-अपलोड करणे व शाळांमार्फत विद्यार्थ्यांना पाठवणे यावर भर देत आहे. मात्र आता या निर्णयाला विरोध होऊ लागला आहे.

विद्यार्थ्यांकडे साधने उपलब्ध आहेत का? कोरोना काळात घरातून शिकावे अशी त्यांची परिस्थिती आहे का? निदान मोबाईल घ्यायला, रिचार्ज करायला गरीब, आदिवासी, मजूर यांच्याकडे पैसा आहे का? या गोष्टींचा सरकार कुठेच विचार करताना दिसत नाही. सगळ्याच विद्यार्थ्यांकडे मोबाईल व रिचार्ज आहे असे गृहीत धरून सर्व ऑनलाईन शिक्षण चालू आहे. हे धोकादायक व सामाजिक दरी निर्माण करणारे आहे. त्यामुळे सरकारने आधी विद्यार्थ्यांना या सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात अशी मागणी परिवर्तन सामाजिक संस्थेचे राज्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदना द्वारे केली आहे.

ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वाड्या वस्तीवरील, आदिवासी पाड्यावरील, शहरातील झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा सरकारी शाळा व शिक्षक प्रयत्न करत आहेत. हे कौतुकास्पद आहे पण दुसरी बाजू कोण आणि कधी समजून घेणार.? आपण गरीब आहोत म्हणून चांगला मोबाईल नाही, इंटरनेट नाही, या न्यूनगंडातून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना ही घडल्या आहेत.

प्रत्यक्षात जे विद्यार्थी हे शिक्षण घेणार आहेत, त्यांच्या परिस्थितीचा विचार सरकारच्या सध्याच्या ऑनलाईन शिक्षणाच्या धोरणात कुठेच होताना दिसत नाही. अनेक गरीब पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल/ टॅब नाहीत, रोजगार गेल्याने अन्नधान्याला पैसे नाहीत.. तर इंटरनेटसाठी रिचार्ज कसा करणार..?

या बाबींचा प्राधान्याने विचार करून सरकारने आधी जिल्हा परिषद व महापालिका शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना मोबाईल टॅब उपलब्ध करून द्यावे, इंटरनेटची सोय करावी व मग ऑनलाईन शिक्षणाचा घाट घालावा अन्यथा आझाद कामगार संघटना राज्यभर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन करेल त्याला सरकार सर्वस्वी जबाबदार असेल असे वाघमारे यांनी सांगितले.

गरीब, आदिवासी, शेतमजूर, झोपडपट्टीतील पालक, हातावर पोट असणारे कष्टकरी यांचा सध्या रोजगार गेला आहे. घरात खायला अन्न नाही अशी परिस्थिती आहे. त्यांच्या पोटापाण्याच्या समस्या आधी सुटणे गरजेचे आहे. कित्येक लोकांकडे अजून फक्त साधे मोबाईल आहेत. साधा रिचार्ज करायला पैसे नाही. त्यांनी आपल्या मुलांना कसे ऑनलाईन शिक्षण द्यावे. सरकारने आधी प्रत्येक विद्यार्थ्यांला मोबाईल टॅब व रिचार्जसाठी महिन्याला थेट पैसे द्यावेत मगच हा ऑनलाईन शिक्षणाचा घाट घालावा असे वाघमारे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

मृत्युदर जास्त असणाऱ्या १० प्रमुख जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित

तंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!