🕒 1 min read
मुंबई : नऊ सप्टेंबर रोजी मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली; त्यामुळे ज्यांची नोकरी व शैक्षणिक प्रवेश अडचणीत सापडले, त्या युवकांमध्ये प्रचंड नैराश्य आले. तसेच हजारो मराठा विद्यार्थी-उमेदवार आत्महत्येच्या काठावर उभे आहेत. म्हणूनच या स्थगितीचा अन्वयार्थ लावणे आणि विविध पर्याय देणे क्रमप्राप्त आहे. यासाठी आता मराठा समाज कमालीचा आक्रमक झाला आहे.
त्यामुळेच आता मुंबईत मराठा क्रांती मोर्चा मशाल मार्च आज सायंकाळी 5 वजात मातोश्रीवर धडकणार आहे. मराठा आरक्षण लागू व्हावं, सुप्रिम केर्टात ते टिकावं, यासाठी मराठा क्रांती मोर्चाने आज मशाल मार्चचं आयोजन केलं आहे. मात्र, मराठा क्रांती मोर्चा अजूनपर्यंत सर्व नियम पाळून, शांततेत झाला आहे. त्याप्रमाणेच आजचा मशाल मार्चही शांततेत काढण्यात येईल. मोर्चेकरी हे बांद्रा कलेक्टर कार्यालयाच्या समोरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात जमणार आहेत. मोर्चासाठी पूर्व तयारी म्हणून बैरिकेट्स आदिची व्यवस्था करण्यात आली आहे.
सुरक्षा व्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर वांद्रे, खेरवाडी येथे पीडब्ल्यूडी ग्राऊंडमध्ये वाहने पार्किंगची सोय करण्यात आली आहे. मोर्चेकर्त्यांच्या वतीने मातोश्रीवर माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.
मात्र, सुरक्षेच्या कारणास्तवर या मोर्चाला मातोश्रीवर जाण्यास मज्जाव करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यावर शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी राज्यसरकारला थेट इशारा दिला आहे. मातोश्रीवर मशाल मोर्चाला परवानगी नाकारुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रडीचा डाव खेळत आहेत. मात्र, आज कोणत्याही परिस्थितीत मातोश्रीवर मोर्चा जाणारच, असा निर्धार मेटे यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या भावना ऐकून घ्यायच्या आहे की नाही? मराठा समाजाला न्याय द्यायची की नाही, हा निर्णय अखेर मातोश्रीलाच घ्यायचा आहे. आता ठाकरे घराणे मराठा समाजाच्या पाठिशी आहे किंवा नाही, हे पाहायची वेळ आहे. त्यामुळे आम्ही मातोश्रीवर जात आहोत. कोणत्याही परिस्थितीत आज मशाल मोर्चा मातोश्रीवर जाणारच, असे विनायक मेटे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्रीपद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिले – खडसे
- मोदी सरकारकडून निर्बुद्धपणे निर्णय घेतले जात आहेत – पृथ्वीराज चव्हाण
- कांद्याचे भाव स्थिरच, आता पुन्हा आवक घटली!
- पाच हजार कोटी रुपये द्यावे लागणार असल्याची फडणवीसांची माहिती खोटी ठरली – सचिन सावंत
- तरुणाईमध्ये उत्सूकता निर्माण करणारी Royal Enfield ‘Meteor 350’ अखेर भारतात देखील लाँच !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

